Tarun Bharat

सातारा जिल्हय़ात काँग्रेस पक्षाकडून कोरोना सहाय्यता केंद्राची स्थापना

प्रतिनिधी/ सातारा

 सातारा जिल्हय़ात जरी कडक लॉकडाऊ जरी असले तरी, सातारा जिल्हा काँग्रेस कमीटीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीच्या आदेशावरून जिल्हय़ामध्ये ‘कोव्हीड सहाय्यता केंद्र’ सुरू केले असल्याची माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते शनिवारी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सातारातील कोविड सहाय्यता केंद्राला ही भेट दिली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब कदम, नरेश आदी उपस्थित होते.

 तसेच या केंद्रात संबंधीतांचे कॉल रिसिव्ह करण्याकरीता 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व उपयुक्त टेलिफोन क्रमांक त्याकेंद्रात असुन कोणाचाही फोन आला तर त्यांना त्वरीत मदत करण्याची भुमीका या 6 जणांची आहे. अशा प्रकारे सातारा जिल्हय़ातील एखाद्या रूग्णाला मुंबई, कोल्हापुर सारख्या ठिकाणी काही बेड हवा असल्यास किंवा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यास ती व्यवस्था जिल्हा काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमीटीच्या नेटवर्क च्या माध्यमातुन रूग्णांना मदत पोहचविण्यात येणार आहे.

 सध्या सरकार जरी आपले काम करत असले तरी सरकारच्या कामाला हातभार लावण्याकरीता, सर्वसामान्यांना थेट मदत व्हावी हा उद्देश या मागचा आहे.  महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमीटीने ही यंत्रणा मोठय़ा प्रमाणात उभी केली असुन राज्यातील कोणत्याही ठिकाणी सातारा जिल्हय़ातील रूग्णाला मदत हवी असल्यास तेथील कोव्हिड मदत केंद्राशी संपर्क साधुन संबंधीना मदत पोहचविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच हिरेन खुन खटला व बाँब प्रकरणी सीबीआय तपास करत असुन त्याबद्दल बोलने त्यांनी यावेळी टाळले.

लसीकरण केंद्रांवरील गर्दी कशी थांबविणार

लसीच्या मागणी पुरवठय़ात गफलत असुन, केंद्राने उपलब्धतेचा अभ्यास न करता किंवा अंदाज न घेता मागणी केली आहे. त्यामुळे लसीचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. तसेच आता 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले आहे.  देशाच्या लोकसंख्येच्या 10 टक्के लोकांपर्यंत अद्याप पहिला डोसच पोहचला नाही. आत्ताच लसीकरण केंद्रांवर इतक्या प्रमाणात गर्दी होते, तर 1 तारखेनंतर तर गर्दी अधिक प्रमाणातच होईल ती आता रोखणार कशी?

राज्यातील गॅसिफिकेशन प्लाँट सुरू करावेत

ऑक्सिजनची मागणी मोठय़ा प्रमाणात असल्याने सध्या रेल्वे वाहतुकीचा वापर यासाठी होतच आहे, त्याचबरोबर वायु सेनेचा वापर ही करून मुंबई, नागपुर सारख्या ठिकाणी हे उतरविले पाहिजेत. तसेच राज्यातील बंद पडलेले गॅसिफिकेशन प्लाँट त्वरीत सुरू करून तेथे टॅंकरची व्यवस्था करून हे सिलिंडर भरण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच राज्यात रेमेडीसीयस ची निर्मीती होत नसल्याने ही औषधे इतर राज्यातुन मागविण्यात येतात त्यामुळे हा तुटवडा जाणवत आहे.

केंद्राच्या चुकीमुळे सुसरी लाट

 केंद्रसरकारने योग्य वेळी खरबदारी न घेतल्याने किंवा धोक्याची ईशारा योग्यवेळी न दिल्यामुळे ही दुसरीलाट मोठय़ा प्रमाणात पसरली आहे. आता केंद्राला जाग आल्याने लॉकडाऊन करणे, निर्बंध घालण्याचे निर्णय घेण्यात येत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्यामागे केंद्र सरकारच अधिक प्रमाणात जबाबदार आहे. तसेच केंद्राने महाराष्ट्र राज्यावर कुरघोडीचे राजकारण करू नये असा टोला ही त्यांनी लगाविला.

Related Stories

चोरीचा मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्त

Patil_p

मुंबई पोलीस आयुक्त नगराळेंनी घेतली गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट

Archana Banage

सांगलीत आज 5 जणांचा कोरोनाने मृत्यू, तर 31 जण कोरोनामुक्त

Archana Banage

जिह्यातील खाणपट्टय़ांचे फेरलिलाव होणार

Patil_p

सांगलीतील तरूणाचा कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू

Archana Banage

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

Abhijeet Khandekar