Tarun Bharat

सातारा : जुंगटी ते कात्रेवाडी रस्ता होण्यासाठी युवकांनी गाठला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुंबईतील जनता दरबार

वार्ताहर / कास :
जावली तालुक्यातील दुर्गम कात्रेवाडी गावापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता होण्यासाठी गावातील तरूण पिढीने गाठला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मुंबई येथील जनता दरबार उपमुख्यमंत्र्यांनी संबधीत वनअधिकाऱ्यांसह संबधीत विभागाला प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना दिल्याने ग्रामस्थांच्या रस्ता गावात पोहोचण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत

जावली तालुक्यातील कात्रेवाडी हे गाव दुर्गम म्हणुन ओळखले जाते या गावात रसत्यासह शासनाच्या अनेक सोईसुविधांचा आभाव आहे शासनांच्या सोईसुविधेचा लाभ व दळणवळणाच्या मुख्यप्रवाहात येण्यासाठी गावापर्यंत डांबरीकरणाचा पक्का रस्ता हाेणे म्हहत्वाचे असुन ग्रामस्थ गेली अनेक वर्ष जुंगटी ते कात्रेवाडी असा दिड ते दोन किलोमिटरचा मातीचा कच्चा रस्ता पक्का होण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन पातळीवर पाठपुरवा करत आहेत गावाच्या चारही बाजुला वनविभागाची जमीन येत असल्याने व हे गाव वन्यजीव विभागाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने रस्ता होण्यासाठी वनविभागाच्या परवानगीची गरज असुन हि परवानगीची प्रस्ताव फाईल वनविभागाच्या कार्यालयात धुळ खात पडुन असल्याने कोणतीच कार्यवाही वेळेत होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर अजित पवारांची बुधवारी भेट घेवुन समस्या मांडली आहे

जुंगटी ते कात्रेवाडी या दिड ते दान किलोमिटर मातीच्या मार्गावर उन्हाळ्यात गरजेनुसार किरकोळ वाहतुक सुरू असते मात्र पक्का रस्ता नसल्याने अनेक अडचणींचा नागरीकांना सामना करावा लागतो पक्का रस्ता होण्यासाठी वनविभागाच्या परवानगीची गरज असुन ति फाईल सातारा वन्यजीव व वनविभाग कार्यालयात धुळ खात पडुन असल्याने ग्रामस्थांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी कार्यालय मुंबई येथे बुधवारी भरलेल्या जनता दरबारामध्ये भेट घेतली व रसत्याच्या विषयाची समस्या मांडली उपमुंख्यमंत्र्यांनी तातडीने सातारा वन्यजीव विभागाचे प्रमुख आधिकारी उत्तम सावंत यांना तातडीने फोनवरून रस्ता परवानगीचा प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही कात्रेवाडी सदर्भातील असणा-या अडचणी सोडवण्याच्या सुचना देतो असे सांगीतले त्यामुळे गावापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता होण्याच्या नागरीकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत

Related Stories

पालिकेच्या प्रशासकीय सभेत ६७ विषयांना मंजुरी

Archana Banage

साताऱ्यात माल वाहतूक रेल्वेचा अपघात

datta jadhav

सातारच्या आडत असोसिएशनच्या अध्यक्षास कोरोनाची बाधा

Patil_p

उपनगराध्यक्षांकडून किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याची पाहणी

datta jadhav

वडूजमध्ये पुन्हा अपक्षांच्या हाती सुकाणू

Patil_p

पदाधिकारी निवडीने जिह्यात शिवसेनेत चैतन्य

Patil_p