Tarun Bharat

सातारा : डबेवाडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

कुत्र्याच्या हल्ल्यात डबेवाडीतील 3 महिला जखमी

परळी / वार्ताहर :

सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या डबेवाडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यांमुळे गावात दहशत पाहायला मिळत आहे. कुत्र्याने माणसांवर, गुरांवर तसेच शेळीवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हल्ल्यातील जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, डबेवाडी येथील वंदना संजय रसाळ (वय 43), लिलाबाई लक्ष्मण माने (65) व संगीता दयानंद माने (42) या महिला कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता, गावातील पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलांना कुटुंबीयांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, सकाळी पळण्याचा सराव करणाऱ्या आंबवडे खुर्द येथील रवी किसन सुर्वे (29) यांच्यावरही कुत्र्याने हल्ला करुन जखमी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Related Stories

105 कोटींच्या दंडवसुलीसाठी मेघा इंजीनियरिंगचे निढळमध्ये खाते सील

Patil_p

जंगली मांजरीच्या नखांची तस्करी करणाऱया दोघांना अटक

Patil_p

बोरगाव पोलिसांनी उघडकीस आणली हायवे रॉबरी

Archana Banage

सातारा : ओझर्डेतील जवानाला सिक्कीममध्ये वीरमरण

datta jadhav

खंडाळा पोलिसांकडून चोरट्यांची टोळी जेरबंद

datta jadhav

कासच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ

datta jadhav