Tarun Bharat

सातारा : डाव्या कामगार संघटनांच्या संपाला अल्प प्रतिसाद

एलआयसी समोर निदर्शने, पोस्टाला लागला टाळा, महावितरण कार्यालयाच्या गेटवर निदर्शने, जिल्ह्यात कामकाज सुरूच
सातारा / प्रतिनिधी

केंद्र सरकारवर रोष ठेवत देशातील डाव्या संघटनांनी पुकारलेल्या संपाला सातारा जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला.एलआयसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नेहमीप्रमाणे वसंतराव निकम यांच्या नेतृत्वाखाली मोजक्या कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन केंद्र सरकारच्या निषेध केला. पोस्टल कर्मचाऱ्यांनी मात्र या संपात 95 टक्के सहभाग घेतल्याने ग्रामीण भागात टाळे लागले होते.महावितरणच्या कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली.जिल्ह्यात महावितरणचे काम सुरू होते.


केंद्र सरकारच्या निषेधार्थ डाव्या विचारांच्या कामगार संघटनांनी संविधान दिनाच्या दिवशी देश व्यापी आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील डाव्या कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.त्यात वसंतराव निकम यांची विमा कर्मचारी संघटना, क्रेन एम्प्लॉयज संघटना,अल्फा लावलं युनियन यांनी एलआयसी समोर आंदोलन केले.वसंतराव निकम यांनी मोजक्या आंदोलनकर्त्याना मार्गदर्शन करत मोदी सरकार कसे कामगार विरोधी आहे हे त्यांनी बिंबवले.तसेच निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.


पोस्टाच्या समोर निदर्शने
पोस्टल कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला.95टक्के संपात कर्मचारी सहभागी झाले होते.मोहन विभूते, वसंत कुंभार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.पोस्टाची सेवा ठप्प झाली होती.


मोजके वीज कर्मचारी सहभागी
देश व्यापी संपात सातारा जिल्ह्यातील मोजकेच कर्मचारी सहभागी झाले होते.जिल्ह्यातील महावितरणचे ग्रामीण भागात ऑफिसीयल आणि बाहेरील काम सुरू होते.फक्त वीज बिल भरणा केंद्र बंद होते.कृष्णानगर येथे आंदोलन करण्यात आले.

Related Stories

फलटणचा रेव्हेन्यू क्लब बनतोय तळीरामांचा अड्डा

datta jadhav

सातारा : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 17.66 मि.मी.पावसाची नोंद

Archana Banage

नोकरीच्या अमिषाने 90 हजारांची फसवणूक

Patil_p

खा. उदयनराजेंनी वढु बुद्रुक येथे संभाजी महाराजांना केले अभिवादन

datta jadhav

ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवा

datta jadhav

सातारा : तब्बल सात वर्षांनी सज्जनला मिळाले त्याचे कुटूंब

Archana Banage