Tarun Bharat

सातारा : डोंगर माथ्यावरील साद्याभोळ्या जनतेला राजकीय अश्वासने देऊन भुलवण्याचा प्रकार

Advertisements

गाढवली, उत्तेश्वर, लामज मुरा मातीच्या रस्त्याची दुर्दशा, डांबरीकरण करण्याची स्थानिकांची मागणी
पंधराहुन अधिक वाड्यावसत्यावरील नागरिक पक्क्या रस्त्याविना भोगतायत मरणयातना

वार्ताहर / कास (अंकुश कोकरे)

मिनी काश्मीर अशी ओळख निर्माण झालेल्या तापोळ्याच्या समोरील डोंगर माथ्यावर जवळपास पंधरा वाड्या-वस्त्या आहेत. एवढी वस्ती असूनही येथे अजून पक्का रस्ताच पोहोचला नसल्याने नागरिकांना स्वतंत्र्या पलीकडील जीवन जगावे लागत आहे. दैनंदिन जीवन जगण्यासाठीही येथील लोकांना रस्त्याआभावी वर्षानुवर्ष मरणयातना भोगाव्या लागत आहेत. आमदार साहेब जरा आमच्याही रस्त्याकडे बघा ना अशी स्थानिक नागरिकांनी आर्त हाक दिली जात आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील गाढवली, उत्तेश्वर लामज मुरा ते दोडाणी पर्यंत मातीचा रस्ता होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. या रस्त्याची प्रत्येक पावसाळ्यात धूप होऊन खड्डे पडत असल्याने त्याची दयनीय आवस्था झाली आहे. त्यामुळे उत्तेश्वर, लामज मुरा, आकाल्पे मुरा, रूळे मुरा, रेणोशी मुरा, आहीर मुरा, वाळणे मुरा, दरे मुरा, गावढोशी मुरा, पिंपरी मुरा, अडाणी, दोडाणी, आदी वस्त्यांवरील लोकांना आजारी पडल्यास आरोग्य केंद्राच्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी चादरीत गुंडाळून दोघा चौघांच्या खांद्यावरून झोळीची अॅबुलन्स करत उचलुन न्यावे लागते. बाजारपेठेत व शासकीय कामासाठी शहरात जाणे पक्या रस्त्याअभावी अवघड होत आहे. रस्ता असून देखील मजबूतीकरण होत नाही. या डोंगर माथ्यावरील लोकांनी अजून किती दिवस या मरणयातना भोगायच्या? आणि याली जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या येथील रहिवासी करत आहेत.

स्थानिक प्रशासकीय यंत्रणा डोळे झाक करीत असल्याने स्थानिक जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची धूप होऊन रस्ते खड्डेमय होत असल्याने वहातूक पूर्णपणे बंद होते. येथील जनतेला तापोळा महाबळेश्वर या ठिकाणी जोडण्यासाठी हा एकमेव मार्ग असुन अनेक वर्ष्यांपासून खडी डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत धुळ खात पडला आहे. तालुका प्रशासकीय यंत्रणा बांधकाम विभाग मुद्दाम जनतेचा कोंडवाडा करते कि काय असा प्रश्न जनतेला पडलाय. पर्यटन कुशल महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत इतकी दयनीय अवस्था हे दुर्दैव म्हणावे लागेल.

डोंगर माथ्यावरील साद्याभोळ्या जनतेला राजकीय अश्वासने देऊन भुलवण्याचा प्रकार सुरु आहे. गाडवली ते उत्तेश्वर, लामज मुरा, दोडाणी रस्ता सापडला असुन मजबूतीकरणाची कार्यवाही लवकर होण्यासाठी जरा लक्ष घालुन आमच्या मरणयाताना सोडवा की अशी हाक स्थानिक जनतेतुन आमदार साहेबांना दिली जात आहे. डोंगराच्या दुतर्फा दोन प्रमुख गावे व बाराहुन अधिक वाड्यावस्त्या आहेत. दळणवळणासाठी शहराशी जोडण्यासाठी गाढवली ते लामज मुरा दोडाणी हा एकमेव प्रमुख मातीचा रस्ता आहे याची पावसाळ्यात धुप होऊन खड्डे पडतात पावसात वाहतुक पुर्णपणे बंद होते ऊन्हाळ्यात वाहतुक सुरु करण्यासाठी दरवर्षी श्रमदानातुन खड्डे भरून वाहतुक सुरु करावी लागते याचे डांबरीकरण संबधितांनी त्वरित करावे.

शिवराम चव्हाण, सामाजिक कार्यकार्ते, लामज

मोठ्या श्रीमंत लोकांना फिरण्यासाठी महाबळेश्वरात कोट्यावधी रूपये खर्च करून रस्ते बांधता विकासाच्या नावाखाली उधळपट्टी करतात मात्र याच तालुक्यात डोंगरमाथ्यावर राहणाऱ्या जनतेला नागरी सोईसुविधा मिळण्यासाठी पक्का रस्ता मिळत नाही हि आमची शोकांतिकाच म्हणावी लागेल वर्षानुवर्ष आम्ही मरणयातना भोगायच्या किती राजकारणी नुसते आश्वासन देऊन भुलवित आहेत

रामभाऊ ढेबे, लामज मुरा

Related Stories

काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार

Patil_p

तांबवे येथे दोन गटात हाणामारी, 19 जणांवर गुन्हा

datta jadhav

सातारा : शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी

Abhijeet Shinde

जिल्ह्यात वेग मंदावतोय, 24 तासात 360 बाधित

datta jadhav

शेखर सिंह यांनी घेतला पदभार

Patil_p

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ऑनलाईन पालक मेळाव्याचे आयोजन

datta jadhav
error: Content is protected !!