Tarun Bharat

सातारा तहसीलदारांचा सावळा गोंधळ

Advertisements

चक्क मृत झालेल्या ग्रामसेविकेची केली नियुक्ती ;

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकींचा कार्यक्रम लागला असून त्याकरता सातारच्या तहसीलदार आशा होळकर यांनी निवडणूकीच्या कामाकरता जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱयांची नियुक्तीचा आदेश दि. 24 डिसेंबरला काढण्यात आला आहे. त्यावर डिजीटल सही आहे. त्यामुळे सातारा तहसीलदार या फाईल न पहाता डिजीटल सह्या मारतात का?, ताईसाहेबांनी अशा किती फाईलीवर डोळेझाकून सह्या केल्या आहेत ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सातारच्या तहसीलदार आशा होळकर यांचे काम सर्व तालुकावासियांना ज्ञात आहे. परंतु अलिकडच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या कामाध्ये थोडासा बदल झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काम कमी आणि रुबाब मोठा असाच त्यांचा फंडा सुरु असतो. जास्त फाईली असल्याने डिजिटल सही केली आहे. ही डिजीटल सही कोणत्या फाईलवर मारली जाते हेही त्यांना ज्ञात नसावे बहुतांशी. काही ठिकाणी फोटोत मिरवायला ताईसाहेब पुढे असतात. तसाच काहीसा प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे. सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागलेला असून त्याकरता सातारा पंचायत समितीतील कर्मचारी अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एका मृत झालेल्या ग्रामसेविकेला निवडणूकीच्या कामांची आर्डर काढण्यात आली आहे. असा आंधळा कारभार सुरु आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मला हे प्रकरण माहिती नाही. परंतु निवडणूकीच्या कामासाठी अगोदर याद्या पाठवल्या जातात. त्यानुसार नियुक्ती दिली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या शहांना न्यायालयाने ठोठावला 25 हजारांचा दंड

datta jadhav

कर्नाटकातून ऑक्सिजन आणण्यासाठी सातारा आगाराच्या एसटी चालकांची ड्रायव्हिंग

Archana Banage

Satara : महसुल विभागातील कारकुन 2 हजारांची लाच घेताना जाळ्यात

Abhijeet Khandekar

काही तरी चांगल घडतय…गौरी 71 वर्षाच्या वयात कोरोनावर केली मात

Patil_p

‘त्या’ वादावर मिटकरींचं तीन शब्दांचं ट्विट

datta jadhav

आरटीओ ने केला १२३ कोटी २३ लाख महसूल वसूल

Archana Banage
error: Content is protected !!