Tarun Bharat

सातारा : तहसीलदार, प्रांत कार्यालय परिसरातील नो पार्किंगचा घाट रद्द करा

सातारा / प्रतिनिधी

सातारा तहसीलदार कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. या निर्णयाचा फटका या कार्यालयांमध्ये व अन्य परिसरातील कार्यालयात येणार्‍यांना होत आहे. प्रशासनाने नो पार्किंगचा घातलेला घाट रद्द करावा, अशी मागणी युवा राज्य फौंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंन्सिंग पाळला जावा असे कारण देत दि. 22 जून पासून तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालय परिसरात खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. कार्यालयाबाहेर वाहने लावल्यास पोलिस विभागाकडून दंडात्मक कारवाया सुरु झाल्या आहेत. वास्तविक या कार्यालयांच्या परिसरात भूमी अभिलेख, दस्त नोंदणी, सिटी सर्व्हे, भूसंपादन कार्यालय, निवडणूक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक व तालुका निबंधक कार्यालय, सेतू कार्यालय अशी अनेक कार्यालये आहेत. दररोज या कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. शहराच्या मध्यभागी हे कार्यालय असल्याने अन्यत्र वाहने लावून नागरिकांना कार्यालयात येणे सुलभ नाही. जवळ कोठेही पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने कार्यालयाबाहेर लावण्यात येत असलेल्या वाहनांमुळे या परिसरात कायमच वाहतुकीची कोंडी होत असल्याचे तिकुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.


नो पार्किंग झोनमुळे नागरिकांना शारीरीक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये येणार्‍या ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वास्तविक कार्यालय परिसरात असलेली जप्त केलेली वाहने अन्यत्र हलवून परिसरात स्वच्छता केली तर योग्य प्रकारे पार्किंग व्यवस्था होवू शकते. अतिक्रमणे काढली तरी मोठ्या प्रमाणात याठिकाणी जागा उपलब्ध होणार आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवेशद्वारावर दररोज वादावादीचे प्रकार घडत आहेत. दोनच दिवसापूर्वी एका कर्मचार्‍यास मारहाणीचा प्रकार झाला. या परिसरात नो पार्किंग झोन करुन प्रशासनाला जनतेला त्रास द्यायचा आहे का असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. याबाबत सकारात्मक पावले उचलून नो पार्किंगचा घाट रद्द करावा, अशी मागणी तिकुंडे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, विभागीय आयुक्त, पोलिस अधिक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Related Stories

भाजपाचा सेवा पंधरावढा उपक्रमाची फलटणमधून होणार सुरुवात

Patil_p

शशिकांत शिंदेंचा आज उमेदवारी अर्ज दाखल होणार

Patil_p

सातारा : 15 ऑगस्ट रोजी मिठाई विक्रीस सक्त मनाई – जिल्हादंडाधिकारी

Archana Banage

सातारा पालिकेची आज सर्वसाधारण सभा

Patil_p

जिल्हा रुग्णालयात आत्मदहन आंदोलन

Patil_p

राज्यस्तरीय विजेत्या मल्लांसाठी वर्षभर सराव शिबीर

Archana Banage