Tarun Bharat

सातारा : तारळे येथे बाधित रुग्णाची हेळसांड

●कुटूंबियांनी मांडली तरुण भारतकडे कैफियत
●दोन खनाच्या घरात 90 वर्षाच्या कोरोना बाधित रुग्ण महिलेसह राहतय कुटूंब
●गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याच तालुक्यातील प्रकार

प्रतिनिधी/सातारा

सातारा जिल्हा प्रशासन वारंवार होम आयसोलेशनबाबत ओरडून सांगत आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला होम आयसोलेशनची दुसरी खेदजनक बाजू उघडकीस येत आहे. पाटण तालुक्यातील तारळे येथील वरच्या पेठेत 90 वर्षीय महिला कोरोना बाधित तीन दिवसापासून आढळून आली. ती दोन खनाच्या घरातच कुटूंबियांच्या समवेत असून प्रशासन त्यांच्या मृत्यूची वाट पहाते का?,आणखी कुटूंबातल्यांना बाधित होऊ द्यायचं आहे का?, असे प्रश्न त्या कुटूंबियांना पडत असून डॉक्टर फिरकेनात ना कोणी, अशी अवस्था गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याच तालुक्यातील आहे.

पाटण तालुक्यातील तारळे भागात कोरोनाचा इसकूट सुरू आहे. त्यास अनेक गावात कोरोना बाधित रुग्णांचा वाढत चाललेला आकडा निदर्शनास येत आहे. एकट्या तारळे गावात काहींचे बळी ही गेले आहेत. एका बाजूला जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशन हा भारी फंडा काढला आहे. कारण जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात बेडच शिल्लक नाहीत. तर दुसऱ्या बाजूला होम आयसोलेशनची कशी तारांबळ उडते आहे. फज्जा उडतो आहे. त्याचाच एक प्रकार तारळे येथे एका कुटूंबाने आपली व्यथाच तरुण भारतकडे मांडली.

गेल्या तीन दिवसांपूर्वी तारळे येथील वरच्या पेठेतल्या 90 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्रास जाणवू लागल्याने तपासणी केली होती. अतिशय गरीब दोन खनाच्या घरात त्या महिलेसोबत तिचा मुलगा, सून आणि दोन नातवंडे रहातात. घरात वैयक्तिक शौचायल वेगळे नाही. तरीही वैद्यकीय अधिकारी यांनी त्या बाधित रुग्णास घरात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्या वेदनेने तडफडत आहेत. घरातील दोन मुलं त्यांच्या वेदना पाहून भयभीत झाली आहेत. साधी गोळी द्यायला किंवा विचारायला कोणी आले नाही, कोणीतरी मदत करा, अशी विनंती करते. पण कोणीही प्रतिसाद देत नाही. अगदी येरबडून गेलेली आरोग्य यंत्रणा त्यांना घरात ठेवा अशी उत्तर देत आहेत.त्यांनी आरोग्य विभागाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.

असून कोरोनामुळे जीव गेल्यावर यंत्रणा जागी होणार काय असा प्रश्न त्यांनी तरुण भारतकडे व्यक्त करत तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी करा, अशी आर्जव त्या बाधित महिलेच्या सुनेने केली आहे.त्यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण उपचाराविना तडफडत आहेत,असे चित्र आहे.

आजारी नर्सला पाठवले डोंगरकपरीतल्या गावात लसीकरणाला

तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या धडधाकट नर्स असताना आजारी असलेल्या एका नर्सला लसीकरण करण्यासाठी डोंगरावरच्या गावात पाठवले.पायी चालत जात असताना त्या पडल्या.पायाला लागले पण त्यांना सहानभूती देण्याऐवजी त्यांनाच तिथले लसीकरण करून या असा दम भरला गेला.काम करणाऱ्याला बुक्यांचा मार तर वरिष्ठांची खपा मर्जी राखणाऱ्यावर कृपा दृष्टी राखली जात आहे.

Related Stories

जप्त केलेली वाहने मिळणार परत

Patil_p

कोळकीच्या लिटल मास्टरचा अर्थव दिल्लीत झाला सन्मान

Patil_p

महिला सुरक्षा प्रकल्प राज्यात रोल मॉडेल ठरेल

datta jadhav

मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करावी

Abhijeet Khandekar

ठेकेदाराची सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी

Patil_p

सातारा : जिल्हा बँक ‘उत्कृष्ठ कार्यक्षमता’ पुरस्काराने सन्मानित

datta jadhav