Tarun Bharat

सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी निगेटिव्ह

सर्वांनीच टाकला सुटकेचा निश्वास : ठाण्यात घेण्यात येतेय काळजी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुह्यांमध्ये पकडलेला संशयित कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या संशयिताच्या संपर्कात आलेल्या 12 पोलीस कर्मचाऱयांसह सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र या सर्व कर्मचाऱयांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्या असल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला असून आता पोलीस ठाण्यात आणखीन काळजी घेण्यात येत आहे.

एकतर लॉकडाऊनच्या काळापासून जवळपास तीन महिने रस्त्यावर असणाऱया पोलिसांना संसर्गाची प्रचंड भीती होती. मात्र पोलिसांनी निडरपणे लॉकडाऊन काळातील बंदोबस्त निभावला. या काळात कोरोना रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्याची कामगिरी करण्यापासून ते क्वांरटाईनवर लक्ष ठेवणे तसेच नवीन आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारीही पोलिसांनी पार पाडली.

या सर्व काळात सातारा तालुका पोलीस ठाण्याचा कोणीही कर्मचारी बाधित झाला नाही. मात्र एका गुन्हय़ात पकडलेल्या संशयिता ताब्यात घेतल्यानंतर व त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची तारांबळ उडाली होती. या कैद्याच्या सहवासात आलेल्या या पोलिस कर्मचाऱयांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र या 12 ही पोलीस कर्मचाऱयांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांच्यासह सातारा पोलीस ठाण्यामध्ये काम करणाऱया सर्व पोलीस अधिकाऱयांसह कर्मचाऱयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Related Stories

शिवसेनेच्या शहरप्रमुखांना कोरोनाची बाधा

Patil_p

”मोदी सरकारने पेगॅसस विकत घेतलं की नाही ?” राहुल गांधींचा सवाल

Archana Banage

उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा – नारायण राणे

Archana Banage

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! पीए कुंदन शिंदे, संजीव पलांडेंना ईडीकडून अटक

Tousif Mujawar

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

datta jadhav

सांगली : बापाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा व सुनेवर गुन्हा दाखल

Archana Banage