Tarun Bharat

सातारा तालुक्यातील ७४ जणांना पुरवठा विभागाच्या नोटीसा

सरकारी नोकरदार घरात असताना घेतला रेशनचा लाभ ; तहसीलदार आशा होळकर यांनी मोहिम तीव्र करण्याचे दिले आदेश :
धान्याची बाजारभावाप्रमाणे करण्यात येणार वसुली

प्रतिनिधी/सातारा

सातारा तालुक्यात 194 गावे आहेत. या प्रत्येक गावात काही शासकीय नोकरदारांनी माहिती दडवून आपले उत्पन्न दडवून शिधा पत्रिका दारिद्रय़ रेषेखालची किंवा इतर रेशन कार्डवरुन लाभ घेतला जात आहे. सातारा तहसील कार्यालयाकडे आलेल्या तक्रारींवरुन सातारा तालुक्यातील प्रथम दोन गावात तपासणी करण्यात आली असून 74 जण आढळून आले आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून धान्याची बाजारभावाने वसुली करण्यात येणार आहे. सातारा तहसिलदार आशा होळकर यांनी मोहिम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा तालुक्यात रेशन दुकानादारांनी वेळोवेळी शासनाच्या परिपत्रकानुसार जी जी माहिती मागवली जाते. त्या माहितीनुसार पुढे कार्यवाही केली जाते. सातारा तालुक्यातील 194 गावांपैकी काही गावांमध्ये खरी माहिती दडवून ठेवून रेशनचा लाभ घेतला जातो. तशा तक्रारी दाखल झाल्याने सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, सेवानिवृत्त कर्मचारी, पेन्शनधारक असूनही रेशन योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास येताच कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार सातारा तालुका पुरवठा विभागाने गेल्या चार दिवसांपुर्वी राजापूरी आणि अपशिंगे मिल्ट्री या दोन गावांची तपासणी केली. अपशिंगे मिल्ट्री येथे 70 तर राजापूरी येथे 4 जण आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याकरता कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्या नोटीसामध्ये 2014 पासून आजअखेरपर्यंत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा मंत्रालय मुंबई मार्फत स्वस्त धान्याचा लाभ शासकीय धान्य दुकानादाराकडून घेतल्याचे निदर्शनास येत आहे. आपण स्वतः किंवा आपले कुटुंबातील लाभार्थी सदस्य हे शासकीय कर्मछारी, सेवानिवृत्त शासकीय पेन्शनधारक आहेत, अशी खात्री झाल्याने आपणास 2014 पासून ते आजपर्यंत आपण बेकायदेशीररित्या व शासनापासून खरी माहिती लपवून ऑनलाईन शिधापत्रिका बारा अंकी नंबरद्वारे धान्याचा लाभ घेत आल्याचे निदर्शनास आले आहे. तरी आपण शासन निर्णय दि.5 नोव्हेंबर 1999 अन्वये केसरी शिधापत्रिकेऐवजी आपले उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असल्याने शुभ्र शिधापत्रिका धारण करणे आवश्यक आहे.आपण केशरी शिधापत्रिकाद्वारे कमी उत्पन्न दाखवून स्वस्त धान्याचा लाभ घेत आहात. आपण पेन्शन, पगार असा दुहेरी लाभ घेत आहात. तरी नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत आपले म्हणणे तलाठी, रेशन दुकानदार, प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करावे अन्यथा आपल्यावर अत्यावश्यक सेवा अधिनियम 1995 चे विहित कलमाच्या अंतर्गत तसेच भा.द.वि. कलम 199,200 व 192 (2) मधील तरतूदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. दरम्यान, सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा तालाक्यात पुरवठा विभाग मोहिम तीव्र करण्यात येणार आहे, असे तालुका पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

Related Stories

चाफळला फौजदाराची खुर्ची रिकामी

datta jadhav

अनिल देशमुख आज देखील ईडी कार्यालयात गैरहजर, वकील म्हणाले…

Tousif Mujawar

सातारा वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया जूनपासून

Patil_p

मंत्री छगन भुजबळांचे गणरायाला साकडे, म्हणाले…

Archana Banage

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; भाई जगताप यांच्याविरोधात…

datta jadhav

मला सत्तेची आणि खुर्चीची लालसा नाही: पंकजा मुंडे

Archana Banage