Tarun Bharat

सातारा तालुक्यात सहा जणांना कोरोनाची बाधा

प्रतिनिधी / सातारा

सातारा तालुक्याचा आकडा वाढता वाढत चालला आहे. कोरोनाचा कहर कमी होण्याचे नाव घेत नसून नव्याने साखळय़ा तयार होत आहेत. जिहे येथील दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका वयोवृद्धाला सारीची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. मुंबईत कोरोनाबाधित क्षेत्रात सेवा देणार्‍या लिंब येथील दोन एसटी चालकांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहेत. तसेच क्षेत्र माहुलीत रेल्वे पोलिसांबरोबरच मुंबई येथे एसटी चालक असलेला एक असे दोन जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. शाहुपूरी येथील दौलतनगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये गेल्या पाच दिवसांपासून बेकायदेशीर रहात असलेल्या युवकास कोरोनाचीबाधा झाली आहे. नव्याने जे रुग्ण आढळून आले त्या ठिकाणी मायक्रो कंटेटमेंट झोन करण्यात आले आहेत.

सातारा तालुक्यात नव्याने रात्री सहा रुग्ण कोरोनाचे आढळून आले आहेत. तालुक्याच्यावतीने सभापती सरिता इंदलकर, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी याचा आढावा घेतला आहे. संबंधित ठिकाणी भेटीही दिल्या आहेत.

दरम्यान, शाहुपूरीतल्या दौलतनगर भागात अनाधिकृतपणे एका अपार्टमेंटमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एक युवक रहात होता. तो युवक कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी गावचा. तो मुंबईहून दि. 25 रोजी आला होता. त्या युवकास गावात ग्रामसमितीने घेतले नसल्याने तो शाहुपूरीतील दौलतनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये भाडयाने एका प्लॅटमध्ये राहू लागला. त्याला दोन दिवसांपासून त्रास होवू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचा स्वॅब घेतला तेव्हा तो बाधित सापडला. त्याचा रिपोर्ट येताच पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील, शाहुपूरीचे सरपंच गणेश आर्डे, ग्रामसेवक मोहन कोळी यांनी तातडीने लगेच त्या ठिकाणी भेट दिली. आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्याकडून त्या अपार्टमेंटची पाहणी करुन तेथे निर्जंतुक फवारणी करण्यात आली. तेथील माहिती घेतली असता तो अनाधिकृतपणे राहत असल्याचे समोर आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

क्षेत्रमाहुलीतल्या दोन जणांना बाधा
अगोदरच क्षेत्रमाहुलीत पाचजण कोरोनाबाधित आहेत. त्यात दोन डॉक्टर, एक रेल्वे पोलीस व त्यांचे कुटुंबिय यांचा समावेश आहे. आता नव्याने एका रेल्वे पोलिसांची भर पडली आहे. तर एसटीमध्ये चालक असलेला मुंबईतील एका आगारात कार्यरत होता. तो लॉकडाऊनच्या काळात सुट्टीवर माहुली येथे घरी आला होता. परंतु पुन्हा त्यास कामावर बोलवले गेले. कामावर जावून पुन्हा घरी दि.23 रोजी परत आले. त्यांना घरी आल्यानंतर दोन दिवसानंतर त्रास जाणवू लागला. दि.25 रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून क्षेत्रमाहुलीतील पहिलाच स्थानिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामसमितीचे अध्यक्ष या नात्याने सरपंच निलेश जाधव हे सर्व काळजी घेत आहेत.

जिह्यात निकटसहवासितास सारीचा आजार
दोन दिवसांपूर्वी जो कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. तो खालच्या आळीचा असून त्यांच्याच वाडयात त्यांच्याशी दररोज भेटणारा, त्यांच्याशी बोलणारा 68 वर्षाचा वयोवृद्धास गेल्या दोन दिवसांपासून त्रास जाणवत होता. म्हणून त्यांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर सारीचा अहवाल आला आहे. त्यामुळे अगोदरच कोरोनाचा एक आढळून आल्याने जिहेकर धास्तावले आहेत. त्यातच दुसरा रुग्ण आढळून आल्याने आणखी भिती निर्माण झाली आहे.

लिंबातल्या एसटी चालकांना मुंबईतली सेवा नडली
लिंब येथील दोघेही चाळीस वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण हे एसटीच चालक आहेत. मुंबईत कोरोनाचा जास्त प्रार्दुभाव असून तेथे हे दोघेही सेवा देण्यासाठी गेले होते. त्यांना थोडासा त्रास जाणवू लागल्याने क्वॉरंटाईन झाले होते. त्यांचे स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांची पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांनी भेट घेतली. त्या दोघांच्या संपर्कात आलेले क्वॉरंटाईन झाले असून तो परिसर निर्जूंतक करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार जितेंद्र सावंत यांनी दिला आहे. ते लवकर बरे होतील असे सावंत यांनी सांगितले.

Related Stories

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेकडून स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात

Archana Banage

कर भरा अन्यथा मालमत्तांचा लिलाव

Patil_p

राजधानीसह जिह्यात दिवाळीला उत्साहात झाला प्रारंभ

Patil_p

Ajit Pawar: राजीनामा देऊ नका,अजित पवारांचे जितेंद्र आव्हाडांना आवाहन

Archana Banage

जलसंधारणासाठी १० कोटींचा निधी, शेती सिंचन योजनांना होणार फायदा – आ. मकरंद पाटील

Archana Banage

सातारा : संचालकांच्या मालमत्तेवर रिझर्व्ह बँकेने टाच आणावी

datta jadhav