Tarun Bharat

सातारा : त्रिपुटी परिसरात कोरोना रुग्ण सापडल्याने धास्ती वाढली

Advertisements

गोडोली / प्रतिनिधी

त्रिपुटी येथील ३७ वर्षाची पुरुष व्यक्ती कोरोना बाधित असून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे कुटुंब आणि अन्य संपर्कातील २३ जण असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना ब्रम्हपुरी येथे क्वाँरंटाईन करण्यात आले आहे. त्रिपुटी आणि परिसरातील नागरिकांना प्रशासनाने योग्य खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती ग्रामसेवक अभिजित चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून त्रिपुटी येथील एका ट्रकचालकाला संसर्ग झाला असल्याचे समोर आली आहे. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील तसेच परिसरातील २३ व्यक्ती संपर्कात आल्याचे समोर आले आहे.त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने योग्य खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या आहेत.तसेच परिसर सील केला असून योग्य उपाययोजना करण्यात आल्याचे सरपंच सिंधू काटकर यांनी सांगितले. शनिवारी रात्री उशिरा पासून गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून प्रांताधिकारी किर्ती नलावडे, तहसीलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,पोलीस निरीक्षक सुनील गोडसे,तालुका आरोग्य डॉ.जाधव या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सुचना दिल्यानुसार काळजी घेत असल्याचे उपसरपंच यमाजी कुंभार यांनी सांगितले.

संबंधित व्यक्ती ट्रक चालक असून त्यांच्या समवेत अन्य तीन चालकांना क्वाँरंटाईन केले आहेत. कोरेगाव तालुक्यातील हा दुसरा रुग्ण असून संपूर्ण तालुक्यातील प्रशासन अधिक सतर्क झाले असे पोलीस पाटील सुषमा शेडगे यांनी सांगितले. तलाठी गायकवाड, आरोग्य सेविका मीना मोरे,राहुल माने, सागर काटकर, महेश माने,संजय काटकर यांच्या सह पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ काळजी घेत आहेत.

Related Stories

बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाने मदत करावी : बी जी मांगले

Abhijeet Shinde

जिल्हय़ात महाविकास आघाडीच अभेद्य

Patil_p

डॉ. यशवंत पाटणे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले पुरस्कार जाहीर

datta jadhav

जिल्हय़ाला दिलासा; चार दिवसानंतर आकडा घटला

Patil_p

Satara : एसटी चालकास मारहाण केल्या प्रकरणी दोन जणांना शिक्षा

Abhijeet Khandekar

डंपरची वाहतूक आता शहराबाहेरून

Patil_p
error: Content is protected !!