Tarun Bharat

सातारा : थेट विक्रीमुळे कष्टकरी शेतकरी उद्योजक होईल : हणमंतराव शिंदे

औंध येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत सोयाबीन खरेदी शुभारंभ

वार्ताहर / औंध

व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन माल विक्री करणारा शेतकरी हे चित्र बदलले पाहिजे. मधल्या साखळीशिवाय शेतात पिकवलेला मालाची बांधावरच विक्री झाली तर कष्टकरी शेतकरी उद्योजक होईल असा विश्वासराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हणमंतराव शिंदे यांनी व्यक्त केले.

औंध ता. खटाव येथे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत ‘राजयोग कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने “सोयाबीन शेतीमाल संकलन केंद्रा”चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उद्योजक अमरशेठ देशमुख, व्हा चेअरमन चंद्रकांत पवार, गणेश देशमुख, अनिल माने, संजय भोसले, तानाजी इंगळे, वसंतराव गोसावी, शामपुरी महाराज,नवल थोरात, शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक, सभासद शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, शेतकरी बचत गट कृषी विभागाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम झाले पाहिजेत यासाठी शासनाने अनुदान देऊन या मोहिमेला चालना दिली आहे. ‘विकेल ते पिकेल’ मोहिमेमुळे माल विकण्यासाठी शेतकऱ्यांचा आता थेट कंपनीशी संपर्क येणार आहे. त्यामुळे मधली साखळी नष्ट होऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी बचतगटाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. अमरशेठ देशमुख यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Related Stories

अतीत येथे भरदिवसा घरफोडी, 5 लाखांचे दागिने लंपास

datta jadhav

कराडमध्ये 14 पिस्टल, 22 काडतुसे जप्त

Patil_p

आदर्श शिक्षक पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

datta jadhav

महामार्गावर अपघाताची मालिका

Patil_p

कोयना परिसरात 2.7 रिश्टर स्केलचा भूकंप

Patil_p

रहिमतपुरचा आठवडी बाजार आजपासुन सुरू

Archana Banage
error: Content is protected !!