Tarun Bharat

सातारा : दिवसभरातील 37 जणांसह जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे चौथे शतक

एकुण 401 जण मुक्त
उपचार सुरू असलेल्यांचा आकडा 202
जिल्हय़ाची मुक्ती 67 टक्क्यांवर



प्रतिनिधी/सातारा

देशातला लॉकडाऊन हटवून अनलॉक सुरू केल्याने धडकी भरलेलीच आहे. मात्र सातारा जिल्हय़ात कोरोनामुक्तीमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. मंगळवारीच्या 24 जणांसह जिल्हय़ात एकुण 4,01 जण मुक्त झालेत. बळी 28 असल्याने उपचार घेत असलेल्यांची संख्या आता केवळ 202 आहे.

मंगळवारी पाटणमधून 4, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथून 8, जिल्हा रूग्णालयांतून 1, सह्याद्रिमधून 6, मायणी मेडिकल कॉलेजमधून 10,खावली येथून 7, रायगावमधून 1 असे दिवसभरात एकुण 37 जण मुक्त झाल्याने काही साखळय़ा तुटण्याला मदत झाली.

दरम्यान, मंगळवारी जिल्हा रूग्णालयांत 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांचा स्वॅब तपासणीला पाठवण्यात आलाय. तर मंगळवारी दिवसभरातल्या अहवालांत 152 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी पॉझेटिव्ह किती, हे सांगणारा रात्रीचा पुण्याहून येणारा अहवाल मात्र प्राप्त झालेला नाही.

थोडक्यात पण……

कोरोनाच्या युद्धात शासनाने खरंतर नक्की उपाययोजना काय केल्यात तर थोडक्यात कोविड19 हॉस्पिटल्स की जी सातारा जिल्हय़ात कृष्णा, सह्याद्रि व जिल्हा रूग्णालय अशी 3 आहेत. याशिवाय सुक्ष्म लक्षणे असणाऱयांसाठी कोरोना केअर सेंटर्स की जी प्रत्येक तालुक्यात आहे. व तिसरा टप्पा म्हणजे विलगीकरण केंद्रे.
पहिल्या 2 महिन्यात जिल्हा रूग्णालय, कृष्णा व सह्याद्रिमधून रूग्ण मुक्त होऊन बाहेर येत होते तसेच आता ते तालुकानिहाय सेंटर्समधूनही कोरोनामुक्त होऊन बाहेर येत आहेत.

कोरोनामुक्तीचा टक्का चांगलाच वाढतोय
जिल्हय़ातील बळींचा आकडा वगळता मुक्त होणाऱयांचा आकडा आता थेट 66.50 इतका पोहोचला आहे. आरोग्ययंत्रणा मुक्तीचा आकडा वाढवत आहेत तेंव्हा बाधितांचा आकडा वाढू नये, म्हणून प्रत्येक सातारकरांने काळजी घेण्याची गरज आहे.

मंगळवारी मुक्त झालेल्यांची तालुकानिहाय माहिती……

पाटण
जांभेकरवाडी येथील 49 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक, नवारस्ता येथील 46 वर्षीय महिला व घनबी येथील 62 वर्षीय महिला.

वाई
किरोंडे येथील 25 वर्षीय पुरुष, आसले येथील 26 वर्षीय महिला व 3 वर्ष 5 महिन्याची बालीका, कोंडावले येथील 47 वर्षीय पुरुष, धर्मापुरी येथील 23 वर्षीय पुरुष, जांभळी येथील 32 व 31 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

कराड
खराडे येथील 20 वर्षीय व 42 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष.

कोरगाव
कटापूर येथील 28 वर्षीय पुरुष, शिरंबे येथील 27 वर्षीय पुरुष.

वाई
आकुशी येथील 58 वर्षीय पुरुष, परतवडी येथील 29 वर्षीय महिला व 50 वर्षीय महिला.

जावली
कळकोशी येथील 49 वर्षीय पुरुष.

खटाव
वांझोळी येथील 18 वर्षीय व 54 पुरुष, 19,39,45 वर्षीय महिला. बनपुरी येथील 36 वर्षीय व 30 महिला, 13 वर्षीय युवक, 36 वर्षीय पुरुष व 15 वर्षीय युवक, चिंचणी येथील 21 वर्षीय युवक.

सातारा शेळकेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, निगुड माळ येथील 43 वर्षीय महिला व 21 वर्षीय 52 वर्षीय पुरुष् व रायगाव पोखरी येथील 50 वर्षीय पुरुष.

जिल्हय़ात मंगळपर्यंत

एकुण कोरोनाबाधित 631
एकुण कोरोनामुक्त 401
बळी 28
आजवर निगेटिव्ह 7,639

मंगळवार

एकुण कोरोनाबाधित —
एकुण कोरोनामुक्त 37
बळी 00

Related Stories

सातारा : कॉलेज युवकाला लुटणाऱ्या चोरट्यांच्या दोन तासात मुसक्या आवळल्या

datta jadhav

सातारा : जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व : हणमंतराव शिंदे

Archana Banage

समता पार्टीकडून ‘मशाल’ चिन्हावर दावा, ठाकरे गटाची कोंडी होणार?

datta jadhav

जागेसह घरकुलासाठी पारधी समाजाचे आंदोलन

datta jadhav

सातारा जिल्हयाचा नावलौकिक देशभर करुया

Patil_p

कोल्हापूरच्या युवकाचा अपहरणाचा बनाव उघड

Patil_p