Tarun Bharat

सातारा : देऊर येथून 27 तोळे सोने चोरीला

कोरेगाव / वार्ताहर : 

देऊर (ता. कोरेगाव) येथील विकास तुकाराम कदम यांच्या घरातून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री 27 तोळे सोने आणि 21 हजारांची रोकड लुटून नेली.         

याबाबत माहिती अशी की, देऊर येथील रहिवासी विकास कदम यांच्या घरातील सर्वजण उन्हाळा असल्याने घराच्या स्लॅबवर झोपले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून त्यामधील सोन्याचे मंगळसूत्र, पाटल्या, अंगट्या, मोहनमाळ, चैन, लक्ष्मीहार, बदाम असे एकूण 27 तोळ्याचे दागिने तसेच 30 भार वजनाचे चांदीचे दागिने व 21 हजारांची रोकड चोरून नेली. आज सकाळी चोरीची बाब लक्षात येताच याची खबर विकास कदम यांनी वाठार पोलिसांना दिली. 

घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि स्वप्नील घोंगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी पाहणी केली. तसेच ठसेतंत्रन व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. विकास कदम यांनी वाठार पोलिसात याबाबत फिर्याद दिली असून, अधिक तपास सपोनि स्वप्नील घोंगडे करीत आहेत.         

Related Stories

सातारा : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 14.69 मि.मी. पाऊस

Archana Banage

कणसे मळा अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू

Patil_p

पाचगणीत दुर्मिळ शेकरूंच्या संख्येत वाढ

datta jadhav

शेंदूरजणे येथे जिलेटीनच्या 1600 कांड्या जप्त

datta jadhav

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये कराडची घसरण

Patil_p

वाढीचा आलेख सातव्या दिवशीही 100 च्या खाली

Patil_p