Tarun Bharat

सातारा : धामणेर येथे बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्यावर केली कारवाई

वाठार किरोली / वार्ताहर

सातारा ते रहीमतपूर महामार्गांवर धामणेर सायगाव ता. कोरेगाव हद्दीत सायंकाळच्या सुमारास वाळु वाहतुक प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी (सातारा ग्रामीण) गणेश किंद्रे यांच्या पथकाने सापळा रचून शासनाचा वाळु वाहतुकीबाबतचा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर गौण खनिज वाळु वाहतुक करीत असताना डंपर क्र. ११ एएल ४१८३ चालक संदीप दत्तात्रय जगताप रा. साप ता. कोरेगाव याच्यावर कारवाई करून त्याच्या कब्जातील डंपर व वाळु असा एकुण ९,१२,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संदीप जगताप याच्यावर रहिमतपुर पोलीस ठाण्यात भा.द.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दल गुंतले असल्याचे पाहून वाळू तस्कारांनी उछाद मांडला आहे. रात्री उशिरा अथवा पहाटेच्या सुमारास कृष्णा नदी पात्रातून वाळू चोरी व वाहतूक केली जात होती. बातमीदाराने ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी माहितीची खातरजमा केल्यानंतर कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला होता.
पोलीस उपनिरिक्षक प्रमोद सावंत, पोलीस हवालदार रतन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक साहिल झारी, निर्भया पथकाचे कर्मचारी हेमंत शिंदे व सागर गायकवाड यांनी सायंकाळच्या सुमारास धामणेर कृष्णा नदी पात्र हद्दी पासून रहीमतपूर पर्यंत सापळा रचला होता. जप्त केलेला डम्पर वाळू भरुन रहीमतपूरच्या दिशेने येताना दिसताच, पोलीस पथकाने कारवाई केली.

संशयित आरोपी चालक संदीप दत्तात्रय जगताप रा. साप ता. कोरेगाव याच्याकडे वाळू उपसा करण्याचा अथवा वाहतुकीचा परवाना नसल्याने तो वाळू चोरी करुन वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याचे वाहन जप्त करुन रहीमतपूर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. त्यांला रितसर ताब्यात घेण्यात आले असून कसून चौकशी करण्यात येत आहे.याप्रकरणी पोलीस नाईक
बाळासो भुजबळ तपास करत आहेत.

वाळू चोरीवर पोलिसांची नजर; कडक कारवाई करणार

कोरेगावसह खटाव तालुक्यात वाळू चोरी आणि चोरट्या वाहतुकीवर पोलिसांची नजर असून, कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये घरी बसण्या ऐवजी वाळू चोरी करुन प्रशासनाला आव्हान देणार्‍यांवर कडक कारवाई केली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठे वाळू चोरी असल्यास माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार असून, वाळू वाहतूक करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

गरीबाच्या घरातच पैलवान तयार होतो

datta jadhav

येलमरवाडी येथे निराधार महिलेचा निघृण खून

Patil_p

सातारा : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाला लागणार टाळे

Archana Banage

मॅप्रो गार्डनजवळील अपघात एक ठार ; एक जखमी

Patil_p

सातारा : कास पठारावर जाणार्‍यांवर कारवाई

Archana Banage

सणानिमित्त मोबाईल खरेदीला मोठ्ठी गर्दी

Patil_p