Tarun Bharat

सातारा : नागठाणेत कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या

नागठाणे / प्रतिनिधी :

नागठाणे- गणेशवाडी (ता.सातारा) येथे कोरोनाबाधित वृद्ध रुग्णाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

विलास कोंडीराम साळुंखे (वय.६५) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. १५ दिवसांपासून साळुंखे हे कोरोना आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी पहाटे ते गावातील पाटक नावाच्या शिवारात गेले होते. ते घरी परत न आल्याने त्यांना शोधण्यासाठी घरातील लोक शिवारात गेले असता त्यांनी नायलॉनच्या दोरीने बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याची फिर्याद भाऊ संजय कोंडीराम साळुंखे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून, पुढील तपास हवालदार राजू शिंदे करत आहेत.

Related Stories

साताऱ्यात दरोडय़ाच्या गुन्हय़ातील सराईत गुन्हेगार जेरबंद

Archana Banage

लमाण वस्तीवरील मुलाचा खून किरकोळ कारणातून

Patil_p

दीडशे दिवस हंगाम, इथेनॉल निर्मितीवर भर

Archana Banage

नोकरीला लावतो म्हणून अनेकांना गंडा; झेडपीत गंडा घालणारे रॅकेट कार्यरत

Archana Banage

सातारा : मंगळवार तळे रस्ता बनलाय वादाचे मूळ

Archana Banage

विहिरीचा गाळ काढताना आढळली सतराव्या शतकातील शस्त्र

Patil_p