Tarun Bharat

सातारा : नायगावला विकास निधी मिळावा ; मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन सादर !

प्रतिनिधी / खंडाळा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या नायगावमध्ये प्रस्तावित आठ कोटी 82 लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता व निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक असून भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक अभिवादन करण्यासाठी येत असतात.तर नायगाव हे महाराष्ट्र शासनाच्या ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्रात समाविष्ट आहे. दरम्यान, या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा. यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना तालुका शिवसेनेचे प्रमुख आदेश जमदाडे यांनी फुले दाम्पत्यांची प्रतिमा भेट देत, नायगावच्या विविध कामांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी महेश भोसले,पंकज नेवसे उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नायगाव येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे एक कोटी 30 लाख रुपये, नागरिकांसाठी प्रतिक्षालयाच्या दोन मजली इमारतीसाठी – एक कोटी रुपये, बहुद्देशीय ग्रामपंचायत इमारत बांधणे – 70 लाख रुपये, नायगावला प्राथमिक शाळेची इमारत बांधणे – तीन कोटी 32 लाख रुपये, गावामध्ये अंर्तगत रस्ते कॉक्रीटीकरण करणे – एक कोटी 70 लाख रुपये, तर अंर्तगत कॉक्रीट गटर करणे – 80 लाख रुपये अशी एकूण मिळून सुमारे आठ कोटी 82 लाख रुपयांची कामे नमूद करण्यात आला आहे. सदर कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालयात सादर केले असून या कामांना लवकरात लवकर मंजूरी मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Stories

उद्यापासून जिल्हा बँकेच्या ठरावांना सुरुवात

Patil_p

येलमरवाडी येथे निराधार महिलेचा निघृण खून

Patil_p

दर दोन तासाला बेड उपलब्धतेची माहिती

Patil_p

बिगर निवासी मिळकतधारकांचे तीन महिन्यांचे कर माफ

Patil_p

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Patil_p

साताऱयात पायलट प्रयोग राबविण्याची मागणी

Patil_p