Tarun Bharat

सातारा : पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक शांततेत पार पाडा : निवडणूक निरीक्षक

मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची योग्य ती सोय करावी

प्रतिनिधी / सातारा

पदवीधर व शिक्षक निवडणूक 2020 ही शांततेत पार पाडावी. तसेच या निवडणुकीसाठी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांनी आज केल्या.

निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे यांनी आज पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करुन श्रीकांत देशपांडे पुढे म्हणाले, मतदारांना मतदान केंद्रावर कुठल्याच अडचणी निर्माण होणार नाही यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच मतदानाविषयक काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 100 अधिकारी, कर्मचारी काम करणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 231 सूक्ष्म निरीक्षक नेमले असून 51 झोनल ऑफीसर नेमले आहेत. वाहतुक व्यवस्थेची योग्य ती तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक मदान केंद्र मतदानच्या आदल्या दिवशी सॅनिटायझर करण्यात येणार असून कार्यकरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे व प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी या आढावा बैठकीत सांगितले. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. आत्तापर्यंत आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आढावा बैठकीत सांगितले.

Related Stories

शाहूपुरीचा कोरोनाला रोखण्यासाठी अनोखा फंडा

Patil_p

साताऱयात बर्थ डे बॉयसह 10 मुलांवर गुन्हा

Amit Kulkarni

‘किसन वीर’ कोणाकडे ? दादा की आबा; आज फैसला

Patil_p

मधमाशांचा हल्ला चुकवण्याच्या नादात दरीत पडून युवकाचा मृत्यू

datta jadhav

माणसांचे ऑक्सिजन संपल्यावर तुमची ऑक्सिजन येणार का – सदाभाऊ खोत

Archana Banage

कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 9 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

Patil_p