Tarun Bharat

सातारा : परळी खोऱ्यात पुन्हा कोरोना फोफावतोय

कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करा, वैद्यकिय अधिकारी सचिन यादव

वार्ताहर / परळी

संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ही रुद्रावतार घेत असताना साताऱ्यातही ह्या झळा तीव्रपणे पहायला मिळत आहेत. कोरोना साताऱयात दाखल होवून वर्ष झाले मात्र गत वर्षीच्या कोरोनाच्या तुलनेत ह्यावर्षी पॉटिव्हिटी रेट हा दुप्पटीने वाढला असून जिल्हय़ात व्हेंटिलेटर बेडचाही अभाव हा पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गेल्या कित्तेक दिवसांपासून परळी खोरे हे कोरोना मुक्त होते मात्र पुन्हा कोरोना हा परळी खोऱयात फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे.

21 मार्च रोजी पुन्हा एकदा परळी खोऱयात कोरोनाचा शिरकाव झाला अन् भागातील कातवडी 3, नित्रळ 4, आलवडी 1, केळवली 2, कुस बुद्रुक 3, लावंघर 1, पाटेघर 11, कुरुण 1, आंबवडे 4 असे एकूण 30 कोरोना बाधीत रुग्ण हे आढळल्याने भागात पुन्हा कोरोनाची दहशत पहायला मिळत आहे. त्याच बरोबर परळी आरोग्य केंदातही लसीकरणाचे काम ही त्यातच तत्त्परतेने होत असून ग्रामस्थांनी कोरोनाला सर्वांनी मिळून पुन्हा हद्दपार करुया फक्त शासन नियमांचे तंतोतंत पालन करा असे अवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन यादव, डॉ. उर्मिला बनगर व आरोग्य कर्मचारी यांनी केले आहे.

Related Stories

विनाकारण घराबाहेर पडल्यास पाचशे रुपयांचा दंड

datta jadhav

पदवीधर मतदारांना उमेदवारांनी आणले जेरीस

Patil_p

‘कर्तव्य’च्या प्लास्टिक मुक्ती उपक्रमास प्रतिसाद

Patil_p

राजवाडा युनियन भाजी मंडईत शुकशुकाट

Patil_p

स्वाभिमान दिनी किल्ले अजिंक्यताऱ्यावर 2032 चा निर्धार

datta jadhav

कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात बर्निंग कारचा थरार

datta jadhav