Tarun Bharat

सातारा : पाटण मतदारसंघात मिळणार व्हेंटिलेटर बेड

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची माहिती

नवारस्ता / प्रतिनिधी

पाटण तालुक्यातील रुग्णांच्या सोयीसाठी (कै) शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आठ व्हेंटिलेटर बेड दौलतनगर येथील कोविड सेंटरमध्ये लवकरच सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.दरम्यान मंत्री देसाई यांच्या पुढाकाराने पाटण मतदारसंघात प्रथमच व्हेंटिलेटर बेड ची सुविधा मिळणार आहे.

मंत्री देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचाराकरिता ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये, याकरिता दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. वाढीव 25 ऑक्सिजन बेडचे काम पूर्ण झाले आहे. (कै) शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आठ व्हेंटिलेटर बेडचीही उभारणी सुरु असून लवकरच तेही सुरु होतील. दरम्यान पाटणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. तेथे आणखी 50 ऑक्सिजन बेड सुरु करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे.

ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये 36 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहेत. दौलतनगर व पाटण येथील सेंटरमध्ये प्रत्येकी दोन-दोन ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याचे कामही सुरु करण्यात आले आहेत. या तिन्ही उपचार केंद्राकरिता अतिरिक्त डॉक्टर, नर्से व स्टाफ आवश्यक आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. औषधे उपलब्धतेच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. त्यामुळे पाटण मतदार संघात कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होणार नाही.

Related Stories

तगडय़ा उमेदवारीठी व्यूहरचना

Patil_p

सातारचा घरगुती बनवलेला फराळ पोहचला ऑस्ट्रेलिया, जर्मनीला

Patil_p

प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ल्यांची होणार सुधारणा

Patil_p

डॉल्बी वाजलीच पाहिजे! उदयनराजे आक्रमक

Abhijeet Khandekar

नागठाणेत चोरट्या दारूविक्री अड्ड्यावर छापा

Archana Banage

जागतिक रँकिंग कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून नवनाथ ढमाळ यांची निवड

datta jadhav