Tarun Bharat

सातारा पालिकेची प्रभाग रचना रद्द

नव्याने होणार प्रभाग रचना

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यातील सातारा नगरपालिकेत 8 नगरपालिका प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर करण्यात आला होता. त्यावर हरकत घेण्याचे कामकाज सुरू होते. तत्पूर्वी दि. 11 मार्च रोजी विधी व न्याय विभागाचे प्रभारी सचिव सतीश वाघोले यांच्या सहीच राजपत्र सकाळी व्हायरल झाल्याने सातारा जिह्यातील इच्छुकांचे लवकर नगरसेवक होण्याच्या आशेवर पाणी पडले आहे. त्यात भरीसभर सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांच्या पत्राने पडली. प्रभाग रचना रद्द करण्यात आले असून नव्याने प्रभाग रचना होणार आहे.

जिह्यातील सातारा, रहिमतपूर, पाचगणी, महाबळेश्वर, कराड, म्हसवड अशा आठ नगरपालिकांची मुदत संपलेले आहे. कोरोनामुळे आधीच या निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत. त्यात आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. नगरपालिकांमध्ये प्रारूप आराखडा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता. प्रारूप आराखडय़ात नुसार इच्छुकांनी हरकती दाखल करण्याचे कामही सुरू करण्यात आले होते, असे असताना सोमवारी सकाळी दि. 11 मार्च रोजी राजपत्र मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाले. त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की जाहीर करण्यात आले ही प्रभाग रचना रद्द करून नव्याने कार्यवाही करून प्रसिद्ध करण्यात यावी तसेच त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा राजपत्रात नमूद केल्यानुसार विनिर्दिष्ट करील. असे म्हटले गेले आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने सायंकाळी उशिरा त्या पत्राला अनुकूल असे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकानी दाखल केलेल्या हरकती वा दाखल करण्याचा तयारीत असलेल्या हरकती आता तशाच राहणार आहेत. तर काही इच्छुक मंडळींकडून कसा असेल प्रभाग याचे तर्क वितर्क मांडले जात आहेत.

नव्याने कशी असणार रचना नुकताच निवडणूक आयोगाचा आदेश आला नुसार प्रभाग रचना रद्द करण्यात आली असून नव्याने कशी असेल रचना याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत प्रत्येक प्रभागात एकच नगरसेवक की एका नगरसेवक पुरता एक वार्ड अशी चर्चा सध्या सुरू असून निवडणूक आयोगाकडून जशा सूचना येतील तशी कार्यवाही ही पालिका प्रशासनाकडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Related Stories

सातारा पालिका आता तरी विलिनीकरण कक्ष उभारणार का?

Patil_p

सेवागिरी यात्रेतील श्वान शर्यतीत सातारा येथील काळा नर ’चोरकला’ चॅम्पिअन

Patil_p

भरतगाववाडी येथील माजी सैनिकांच्या पत्नींकडून बचतीचा आदर्श

Archana Banage

Satara : लग्नाचे अमिष दाखवून गैरकृत्य; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखलए

Abhijeet Khandekar

राज्यपालांना आता कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय

datta jadhav

सातारा : आधुनिक काळातही मुलीचा वसा बैलगाडीतून

datta jadhav