Tarun Bharat

सातारा पालिकेची प्लास्टिकमुक्त हॉटेल मानांकन स्पर्धा

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील सर्व व्यावसायिकांच्या सहकार्याने प्लास्टिकमुक्त शहर ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्याकरता हॉटेल्स व व्यावसायिकांनी कोणतीही प्लास्टिकची वस्तू वापरु नये असे आवाहन केले आहे. पर्यावरणाच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी हे प्रबोधन सुरु केले आहे. हे मानांकन दि. 30 डिसेब्ंार  गुगल फॉर्मवर माहिती पाठवण्याचे आवाहन सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केलेले आहे. त्यामुळे या स्पर्धेला आणि अभियानाला सातारा शहरातील किती हॉटेल्स आणि व्यावसायिक प्रतिसाद देतील हे आरोग्य विभागाच्या प्रबोधनावर ठरणार आहे.

सातारा शहरातील हॉटेल्स व व्यावसायिकांसाठी पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षक्क 2022 च्या अनुषंगाने मानांकन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये हॉटेल्स, व्यावसायिकांनी यामध्यें सहभाग नोंदवावा. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पालिकेच्यावतीने हे अभियान राबवण्यात येत असून हॉटेल्स व्यावसायिकांनी आपल्या हॉटेल्सना प्लास्टिकमुक्त मानांकन देण्यात येणार आहे. त्याकरता पालिकेच्यावतीने गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून त्या गुगल फार्मवर शहरातील व्यावसायिकांनी आपली माहिती भरावी अन् तो अर्ज मेल करावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले असून त्यामध्ये काही अटी नमूद केलेल्या आहेत. सर्व हॉटेल्स व व्यावसायिकांनी ग्राहकांना पार्सल देताना प्लास्टिकच्या पिशव्या, बाऊल, द्रोण, चमचे देवू नयेत. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा, त्याऐवजी कागदी, कापडी पिशव्या वापराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेची तारीख दि. 30 डिसेंबर पर्यंत असून पालिकेच्या आरोग्य विभागाकडून किती प्रबोधन होते अन् सातारकरांकडून किती प्रतिसाद मिळतो हे पहायला मिळणार आहे.

Related Stories

सातारा : शाहूपुरीतील मिरचीच्या गोदामाला आग

datta jadhav

सातारा : कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद

Archana Banage

कोरोना नियंत्रणात; थंडी-तापाचे रूग्ण वाढले

datta jadhav

गुजरात सरकारचा राष्ट्रवादीने केला निषेध

Patil_p

लोणंदच्या नगरसेविकेवर चाकू हल्ला करून ऐवज लुटला

Patil_p

सातारच्या महाआरतीने इतिहास घडला

datta jadhav