Tarun Bharat

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित

प्रतिनिधी/ सातारा

पावणे चार महिन्यानंतर काढण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेलाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. पालिकेच्या कोरोना कक्षातील महिला अधिकाऱयास कोरानाची बाधा झाल्याचे समजताच दि. 6 रोजी सायंकाळी उशीरा सभा सचिवांनी सभा स्थगित केल्याचे पत्र काढले असून दि.7 रोजी नगरसेवकांना फोनवरुन निरोप दिला आहे. त्यामुळे पालिकेची होणारी सभा आता पुढे कधी होईल हे सांगता येत नाही. नगरसेवकांनी पालिकेच्या सभेला जाण्याची तयारी केली होती. आता व्हिसीद्वारे सभा घ्यायची म्हटले तरीही नगरसेवकांना तसे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. 

कोरोनामुळे सोशल डिस्टन्स ठेवून प्रतिबंधात्मक काळजी घेवून सभा घेण्याकरता जिल्हाधिकाऱयांकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून परवानगी दिली होती. दि.10 रोजी शुक्रवारी सभेच्या नोटीस पोहचताच शुक्रवार दि. 3 रोजी पालिकेतील महिला अधिकाऱयांस कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली होती. मंगळवारी पालिकेचे कामकाज सुरु झाले असले तरीही त्या महिला अधिकाऱयाच्या संपर्कात अनेक अधिकारी, खातेप्रमुख आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या सभासचिव या नात्याने प्रशासनाने काळजी म्हणून घेण्यात आलेली दि.10 रोजीची सर्वसाधारण सभा स्थगित करण्याचा निर्णय दि.6 रोजीच घेतला आहे. तसे पत्रही काढण्यात आले असून त्यावर नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांची सही असून त्या पत्रानुसार पालिकेतून मंगळवारी सायंकाळी नगरसेवकांना फोनफोनी करुन सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्या सभेत केवळ महत्वाचा विषय हा कोरोनाच होता.

Related Stories

बसथांबे कचरामुक्त कधी होणार?

Patil_p

जीम सुरु करण्यास परवानगी द्या

Patil_p

गुन्हेगार झाले जागे, पोलीस पडले मागे!

Amit Kulkarni

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच वाहतूक कोंडी

Patil_p

वादळी वाऱयामुळे शाळेच्या छतावरील कौले उडाली

Amit Kulkarni

बस्तवाड (ह.) येथे हाफपीच क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni