Tarun Bharat

सातारा : पालिकेत विषय समितीच्या सभापती निवडी बिनविरोध

Advertisements

सातारा / प्रतिनिधी : 

नवीन वर्षात खासदार उदयनराजे हे अनपेक्षित असे धक्के सातारकरांना देत आहेत. खासदार उदयनराजेंनी नवीन वर्षात पहिला धक्का ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करुन दिला. आता पालिकेच्या विषय समितीत सर्व सभापती महिला बिनविरोध निवड करुन दुसरा धक्का दिला. निवड झालेल्यांमध्ये सिद्दी पवार, अनिता घोरपडे, रजनी जेधे, स्नेहा नलावडे आणि सीता हादगे यांचा समावेश आहे. खुर्चीत बसताच नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत हारतुऱ्यांनी करण्यात आले.  

सातारा पालिकेत प्रथमच सर्वच विषय समितींच्या सभापती या महिला आहेत. त्यामध्ये महिला सबलीकरण हे धोरण खासदार उदयनराजे भोसले यांनी समोर आणत नव्याने धक्कातंत्र दिला आहे. त्यामध्ये बांधकाम सभापती म्हणून भाजपाच्या आक्रमक  नगरसेविका सिद्धी पवार यांना संधी दिली गेली आहे. तर पुन्हा आरोग्य सभापती म्हणून अनिता अशोक घोरपडे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. इतरांमध्ये सीता हादगे यांचे काम  चांगले असल्याने त्यांना पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी तर पाठीमागे एकदा नियोजनाचा कारभार सुस्थितीत हाताळल्याने स्नेहा नलावडे यांच्याकडे नियोजनची जबाबदारी दिली गेली आहे. रजनी जेधे या महिला बालकल्याणची जबाबदारी दिली गेली आहे. सर्वच महिला पदाधिकाऱ्यांच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्यावतीने आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पालिकेच्या ज्या-ज्या विभागास निपटारा करण्याच्या सुचना दिल्या. मल्हारपेठेतल्या कुमार खंदारे याने रस्ता बंद केल्याची तक्रार शंकर त्रिंबके यांच्यासह महिलांनी करताच त्यांनी पालिकेच्या संबंधित विभागास कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.  

खासदार तिसरा धक्का दि.16 रोजी देणार आहेत, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती. त्यामुळे याकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Stories

विनापरवाना मांस वाहतूक करणारे दोघे ताब्यात

Omkar B

उपाययोजना करण्यावर नेत्यांचे तोंडावर बोट

Patil_p

शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

Amit Kulkarni

वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावा

Patil_p

सातारा : फडणवीस यांनी मराठ्यांना कशाच्या आधारावर एवढा टक्का दिला?: हेमंत पाटील

Archana Banage

Satara; ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!