Tarun Bharat

सातारा : पीडब्ल्यूडीच्या कृपेने उडतोय धुरळा

Advertisements

डांबरीकरणावर डांबरीकरणाचा घाट, ग्रिटच्या धुरळ्याने वाहनधारक हैराण

सातारा / प्रतिनिधी :

पीडब्लुडीने पारंगे चौक ते आरटीओ ऑफिस या डांबरीकरणाच्या रस्त्यावर डांबरीकरणाचा घाट घातला आहे. डांबरीकरणानंतर रस्त्यावर ग्रिटचा थर साचून प्रवासादरम्यान वाहनाधारकांच्या तोंडावर धुरळा उडत आहे. यामुळे वाहनधारक चांगलेच हैराण झाले आहेत.

शहरातील पारंगे चौक ते आरटीओ ऑफिस या मार्गावर सतत वाहतूक सुरू असते. या मार्गावर खड्डे पडण्याचे प्रमाणही कमी आहे. रस्त्यावर डांबरीकरण करण्याची गरज नव्हती. तरीही पीडब्लुडी च्या वतीने या डांबरीकरणाच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. ठेकेदाराने या कामाच्या शेवटी संपूर्ण रस्त्यावर ग्रिट टाकली आहे. यामुळे रस्त्यावर थर साचला आहे. या ग्रिट वरून जाताना दुचाकी वाहनाचे चाक घसरून अपघात होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

तर वाहनांचा वेग जास्त असल्याने ही ग्रिट उडून नाकात, घशात, डोळयात जात आहे. यांचा धूर हवेत पसरल्याने वाहनधारकांना मार्ग नीट दिसत नाही. यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत संबंधित ठेकेदाराची व पीडब्लुडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. डांबरीकरणाच्या नावाखाली पैसा खर्च करण्याची मुभा मिळाल्याची चर्चा होत आहे.

Related Stories

चांगला तपास करा, अन्यथा तुमची चौकशी लावतो

datta jadhav

यशवंतराव मोहितेंची भाषणे युवा पिढीने अभ्यासावीत

Patil_p

दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश चव्हाण

Patil_p

यवतेश्वर परिसरात मानवी सांगडा सापडल्याने खळबळ

Patil_p

चाचण्यांची संख्या पुन्हा तीन हजारांवर…

datta jadhav

जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये मॉकड्रिल

Patil_p
error: Content is protected !!