सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातून अनेक लोक नोकरीनिमित्त दररोज सातारा-पुणे अपडाऊन करतात. त्याकरिता तब्बल 19 वर्षे सुरू असलेल्या सातारा-पुणे या सेवेचा वर्धापन दिन सोहळा सातारा आगारात प्रवाशांच्यावतीने साजरा करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्या हस्ते सुरक्षित सेवा देणारे वाहक आणि चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच केक कापण्यात आला. राजू भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.