Tarun Bharat

सातारा पोलिसांच्या जुगार अन् दारु अड्डय़ावर छापे

प्रतिनिधी/ सातारा

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार सातारा जिह्यात जुगार व दारु अड्डय़ावर छापे टाकून कारवाई करण्यात आली. जुगार चालवणाऱयावर व दारु विक्री करणाऱयांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर पोलिसांनी शंकर मार्केटमध्ये जुगार चालवणाऱया सुनील सुभाष कदम (वय 48, रा. बुधवार पेठ फलटण) याच्यावर कारवाई करुन 1250 रुपये रोख जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. शाहुपूरी पोलिसांनी सम्राट वडापावच्या आडोशाला चालणाऱया जुगार अडय़ावर छापा टाकून विश्वास लक्ष्मण पवार (वय 42, रा. कामठी) याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याच्याकडून 545 रुपयांची रोखड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच जुना मोटारस्टॅण्ड येथे राजेभोसले संकुलाच्या पार्किंगमध्ये चालणाऱया जुगार अड्डय़ावर छापा टाकून जाफर शहाबुद्दीन सय्यद (वय 50, रा. मल्हारपेठ सातारा), चंद्रमणी धनंजय आगाने (रा. घोरपडे कॉलनी, सातारा) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून 745 रुपये रोकड जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. दहिवडी पोलिसांनी गोंदवले बुद्रुक येथे कारवाई करुन गणेश दाजी शिरतोडे (वय 26, रा. गोंदवले बुद्रुक), सुहास नारायण रणपिसे (रा. दहिवडी, ता. माण) याच्यावर कारवाई करुन त्याच्याकडून 720 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. पाटण पोलिसांनी मल्हारपेठ येथे बबन शंकर पाटील याच्यावर कारवाई करुन 1240 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.

दारु विक्रीच्या कारवाई

सातारा तालुका पोलिसांनी तासगाव येथे मुळीकवाडी फाटय़ावर बेकायदेशीर दारु विक्री करणारा धमेंद्र पिराजी कांबळे(वय 52, रा. मुळीकवाडी) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून 720 रुपयांच्या 12 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. वडूज पोलिसांनी वडूज येथे दारु विक्री करणाऱया संतोष रामराव फडतरे (वय 35, रा. वाकेश्वर) याच्यावर कारवाई करुन 2250 रुपयांच्या 50 बाटल्ल्य हस्तगत करण्यात आल्या. खंडाळा पोलिसांनी बावडा येथे दारु विक्री करणाऱया विनोद बाळू गायकवाड (वय 42, रा. खंडाळा) याच्यावर कारवाई करुन त्याच्याकडून 900 रुपयांच्या दारुच्या 15 बाटल्या हस्तगत केल्या. पुसेगाव पोलिसांनी विसापुर येथील स्मशानभूमीजवळ करंजाच्या झाडाखाली गणेश नारायण जाधव(वय 36, रा. गाववाडी) याच्यावर कारवाई करुन 840 रुपयांच्या दारुच्या 14 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.

Related Stories

राज्यसरकारने मराठा तरुण,तरुणींची झोप उडवली – चंद्रकांत पाटील

Archana Banage

शिवसेना भवनाबाहेर मनसेने लावले लाऊडस्पीकर

datta jadhav

महिलेवर अत्याचारप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा

datta jadhav

नवी मुंबईत सुरू होणार जिओ इन्स्टिट्यूट – नीता अंबानी यांची घोषणा

Archana Banage

विरोधकांकडून सरकारचा निषेध…संसदेत काळ्या पोशाखामध्ये हजेरी

Abhijeet Khandekar

एटीएम कॅश व्हॅन घेऊन चालक फरार

datta jadhav