Tarun Bharat

सातारा पोलीस दलाचा पोलीस महासंचालक पदकांनी केला सन्मान

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पोलीस दलाने केलेल्या चांगल्या कामगिरीबाबत त्यांचा स्वातंत्र्यदिनी विशेष सेवा पदक व पोलीस महासंचालक पदक देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह फलटणचे डीवायएसपी अजयकुमार बन्सल यांनी नक्षली भागात कठीण अशी कामगिरी केली आहे. त्याबाबत त्यांचा गौरव केल्याने सातारा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

सातारा पोलिसांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी नक्षलग्रस्त भागात कठीण आणि खडतर अशी कामगिरी केली त्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक तर फलटणचे डीवायएसपी तानाजी बरडे यांनीही नक्षलग्रस्त भागात कठीण कामगिरी केल्याबद्दल विशेष सेवा पदक व पोलीस महासंचालकांच्याकडून सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनीही नक्षलग्रस्त विभागात कठीण कामगिरी केल्याबद्दल विशेष सेवा पदक, पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस फौजदार मकरंद कवडे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार उत्तम दबडे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, पोलीस हवालदार तानाजी माने यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, संजय शिर्के यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, भुईंज पोलीस ठाण्याचे शिवाजी तोरडमल यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, शिरवळ पोलीस ठाण्याचे हवालदार  रवींद्र कदम यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, पोलीस मुख्यालयातील हवालदार शशिकांत गोळे यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे हवालदार नितीन शेळके यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक प्रवीण फडतरे यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, पोलीस मुख्यालयातील दादासाहेब बनकर यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, स्थानिक गुन्हेचे पोलीस नाईक मोहन नाचण यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, मोटर वाहन विभागाचे सहाय्यक पोलीस फौजदार दिनेश इंगळे यांनाही पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. सातारा पोलिस दलाचा स्वातंत्र्यदिनी गौरव झाला.   

Related Stories

नाक्यावर भटक्या प्राण्यांची दादागिरी

Patil_p

कोरोना योध्या ना संगीतातून जावलीच्या युवकाची साथ

Patil_p

भाजपाच्या ओबीसी सेलची बैठक

Patil_p

दत्ता जाधवाच्या दुसऱया पोरावर गुन्हा दाखल

Patil_p

सातारा जिल्ह्यात 27 जण कोरोना बाधित, 25 जण मुक्त

Archana Banage

खाकीची मानसिकता ढळतेय…!

Patil_p
error: Content is protected !!