Tarun Bharat

सातारा : फेक अकाऊंटवरुन लग्नासाठी धमकी

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :   

सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथील एका युवकाच्या वडील आणि भावाचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करत एका मुलीसोबत लग्न करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजीत आनंदराव जगदाळे (रा. महाडिक कॉलनी, कारंडवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या घटनेतील तक्रारदार अभिजीत यांचे वडील आनंदराव व भाऊ योगेश यांचे फेसबूक व इनस्टाग्राम या सोशल साईटवरील अकाऊंट अज्ञातांनी हॅक केले. यानंतर अज्ञातांनी या अकाऊंटवरुन एका मुलीसोबत लग्न करावे म्हणून धमकाण्यास सुरूवात केली. यानंतर संबंधितांना सतत मेसेज करून मानसिक त्रास देणे सुरूच ठेवल्याने अभिजीत यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनोळखी संशयितांविरोधात तक्रार दिली आहे.  या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे करत आहेत.  

Related Stories

लॉ आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एमसीक्यू पध्दतीने होणार

Abhijeet Shinde

कोरोना मृतांच्या कुटुंबियांची धावाधाव

datta jadhav

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगणात केले आंदोलन

Patil_p

‘जंबो’चे कधी होणार संग्रहालय?

datta jadhav

आज जेष्ठा गौरी चे होणार विसर्जन

Patil_p

साताऱयात आदेश मोडणाऱया 21 जणांवर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!