सातारा / प्रतिनिधी :
सातारा बस स्थानकात सायंकाळी 5 वाजता अचानक लागलेल्या आगीत पाच शिवशाही बसेस जळून खाक झाल्या. अग्निशमन बंबाच्या मदतीने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, एका मनोरुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

