कराड तालुक्यातील घटनेने घबराट
प्रतिनिधी / कराड
विंग (ता.कराड) येथे बिबट्याने भरदिवसा बालकावर हल्ला केला. बिबट्याने पंजा मारून मुलास जखमी केले. शिंदेवाडी येथील ओम विजय शिंदे असे या जखमी मुलांचे नाव आहे. ओमने आरडाओरडा केल्याने लोकांचे वेळेत लक्ष तिकडे गेले. लोकांच्या आवाजाने बिबट्या पसार झाला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
विंग-शिंदेवाडी दरम्यान फडके वस्ती नावाच्या शिवारात ही घटना घडताना मुलांचे कुंटुबीय शेतातील कामात व्यस्त होते. शेतात मुलगा बांधावर होता. यावेळी बिबड्याने अचानक हल्ला करुन ओम याला पंजा मारून जखमी केले. यावेळी मुलांच्या ओरडण्याच्या आवाजाने कुटुंबीयाचे लक्ष गेले. त्यांनी तिकडे धाव घेत आरडाओरडा करताच बीबट्या तेथून पसार झाला.
वनरक्षक व अन् कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन भेट देऊन पाहणी केली. मुलांची विचारपूस केली. जखमी मुलास उपचारासाठी कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात नेण्यास सांगितले.
सातारा : बिबट्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला
Advertisements