Tarun Bharat

सातारा : बेडसाठी रुग्णांसह नातेवाईकांची फरफट

जिल्ह्यात 25 बळी, 716 बाधित
कोरोना डिफेनडर ग्रुपची माणुसकीच्या भावनेने मदत सुरू
लायन्स क्लबने ऑक्सिजनचे 12 सिलिंडर शासनाकडे सुपूर्द
ऑक्सिजनचा पुरवठा बंद होणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे स्पष्टीकरणंबेड मिळवण्यासाठी रुग्ण,
नातेवाईकांची ससेहोलपट होम आयसोलेशन पर्याय चांगला पण आरोग्य विभागही वैतागलेला
मुंबईहुन आरोग्य संचालिका श्रीमती तायडे साताऱ्यात

प्रतिनिधी / सातारा

जिल्हय़ात बदललेलं वातावरण. अवेळी पडणारा पाऊस लगेच उकाडा. यामुळे घरात असलेल्या नागरिकांना या वातावरणाचा त्रास होत आहे. जिल्ह्यातील 1500 गावात कोणी ना कोणी आजारी आहे. आजारी रुग्णांना त्रास जास्त झाल्यावर रुग्णालयात दाखल करायला नातेवाईकांनी प्रयत्न केल्यास बेडच शिल्लक नाहीत. अशी अवस्था सध्या आहे. बेडसाठी रुग्णांची फरफट सुरू आहे. कोविड डिफेनडर ग्रुप सर्वसामान्य रुग्णांच्यासाठी मदतीला धावून जात आहे. त्यातच ऑक्सिजन पुरवणाऱ्या एजन्सीनेच ऑक्सिजन पुरवणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा होणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहणार आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 716 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 26 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना हा आजार आज प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. त्यापासून कोणाची सुटका होताना दिसत नाही. त्यावरील व्हक्सीन कधी येईल याकडे नजरा आहेत. आज जिल्ह्यातील 1500 ग्रामपंचायतीमध्ये आणि सर्वच शहरात कोणी ना कोणी कशाने तरी आजारी आहेत. एवढी भयानक परिस्थिती यापूर्वी नव्हती. त्यात जिल्ह्यात बदललेले वातावरण खूप त्रासदायक ठरू पहात आहे. होम आयसोलेशन हा चांगला पर्याय असला तरीही अगोदरच सततच्या तणावामुळे वैधकीय विभाग पुरता त्रासाला गेला आहे.

कोरोनाबाधित रुग्णावर उपचार घेण्यासाठी जिल्ह्यात बेडच शिल्लक नाहीत. असे सांगितले जात आहे. त्यामुळे बेड अभावी रुग्णांची अवस्था बिकट अशी बनली आहे. सर्वसामान्य रुग्णांचे म्हणजेच ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा रुग्णांचे खूप हाल होत आहेत. अशा रुग्णांसाठी सातारा येथील कोव्हिडं डिफेंडर ग्रुप कार्य करतो आहे. एका रुग्णाला सकाळी 12 पासून रात्री 2 वाजेपर्यंत शहरातील असलेल्या सर्वच कोरोना सेंटरमध्ये बेडची विचारपूस केली. मात्र, बेड मिळाला नाही. कोरोना डिफेडंर ग्रुपचे प्रशांत मोदी यांना ही बाब समजताच त्यांनी रात्री 2 वाजताच जिल्हा रुग्णालयात बेड मिळवून दिला.तसेच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एजन्सीजने अचानक पुरवठा करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे ऑक्सिजनचा अगोदर तुटवडा असल्याने पुन्हा आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला आहे.सामाजिक बांधिलकीतून अनेक मदतीचे हात पुढे येत आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आकडा पाहून राज्याच्या आरोग्य संचलिका श्रीमती तायडे यांचं जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांनी जिल्हा रुग्णालयात आढावा घेतला.

जिल्ह्यातील 716 जणांना कोरोना; तर 25 नागरिकांचा मृत्यू
जिल्ह्यात काल शूक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 716 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 25 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालामध्ये
कराड
तालुक्यातील कराड 12, शेणोली 3, गोटे 3, उंब्रज 7, नांदशी 4, मलकापूर 40, कार्वे 6, ढेबेवाडी 2, कार्वे नाका 17, रेठरे बु. 3, सोमवार पेठ 13, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 7, बनपुरी 1, ओगलेवाडी 9, कपील 1, कोयना वसाहत 12, शिवनगर 3, कासारशिरंबे 2, तांबवे 8, गोळेश्वर 2, नागाव 1, येरवले 4, शिरवडे 4, वहागांव 2, कोर्टी 3, मुत्ताळवाडी 2, आगाशिव नगर 4, आभ्याचीवाडी 2, काले 1, रुक्मिणीनगर 3, गारवडे 1, म्होप्रे 2, विद्यानगर 4, विंग 2, चचेगांव 4, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, सैदापूर 1, गारवडे 1, शेरे 2, हजारमाची 3, अटके 1, चरेगांव 1, टेंभू 1, करवडी 1, राजमाची 1, जखीनवाडी 2, मार्केट यार्ड 1, कोले 1, किरपे 1, तळबीड 1, चोरे 1, पाल 2, कोपर्डे हवेली 1, बेलवडे बु. 1, श्री हॉस्पिटल 1,शारदा क्लिनिक 3, नेर्ले 7, विद्यानगर 2,साखराळे 1, बनपुरी 1, खोडशी 1, उंडाळे 3,

सातारा तालुक्यातील सातारा 3, विकासनगर 4, जकातवाडी 1, तासगाव 1, शाहुनगर 3, राजवस्ती कोडोली 1, चिंचनेर निंब 4, वेण्णानगर 1, अंगापूर 3, जिहे 1, वहागांव 2, केसेगांव 1, मगळवार पेठ 2, शनिवार पेठ 2, सदरबझार 16 , देगांव 2, शाहुपुरी 6, नागठाणे 2, यादोगोपाळ पेठ 2,संगमनगर 2,सज्जनगड 1, वडुथ 2, कृष्णानगर 1, किडगांव 1, राऊतवाडी 3, तामजाईनगर 2, पंताचा गोट 1, भरतगाववाडी 1, डबेवाडी 2, जांभळेवाडी कण्हेर 1, कोडवे 1, पाटखळ 2, शेरेवाडी कुमठे 1, गडकर आळी 2, तांदुळवाडी 1, चिपळुणकर बाग 1, संगममाहुली 1, देगांव रोड 2, धनगरवाडी 1, विसावा नाका 1, संभाजी नगर 1, काशिळ 1, क्षत्र माहुली 1, गोडोली 1, एमआयडीसी 2, गोळीबार मैदान 2, निसर्ग कॉलनी 1, अजिंक्य कॉलनी 1, पोवई नाका 1, मल्हारपेठ 1, लिंब 1, जावळवाडी 1, तांबळेवाडी 1, कोडोली 1, वाढे 1, बोरखळ 1,राजवाडा 1, प्रतापसिंह नगर 1, चिमणपुरा पेठ 1, जयसिंग नगर 1, सदाशिवपेठ 1, रामाचा गोट 2,आर्वी 1, चिंचनेर वंदन 1,कामाठीपुरा 1,

फलटण तालुक्यातील फलटण 7, लक्ष्मीनगर 3, अलजापूर 1, रविवार पेठ 4, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 1, परांदवाडी 1, संजीवराजे नगर 1, कोळकी 6, निंबत बारामती 2, साखरवाडी 1, रिंगरोड 2, तरडगांव 4, शिवाजीनगर 1, मलठण 2, विवेकानंद नगर 1, वडगांव 4, धनगरवाडा 1, घागडे मळा काळज 1, चौधरवाडी 2, भाडळी 1,होळ 1, झिरपवाडी 2, गोळीबार मैदान 2, गुणवरे 1, विढणी 2, वाठार निंबाळकर 1, तेली गल्ली 1, पवारवाडी 4, नांदळ 1, अलगुडेवाडी 1,

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ 3, मोरिगिरी 1, पाटण 3 , तारळे 2, कोरीवले 1, धावडे 2, दौलतनगर 1, मारुल हवेली 1, चाफळ 1, ढेबेवाडी 2,तारळे 1,

खंडाळा तालुक्यातील पळशी रोड 1, जयभवानी नगर शिरवळ 1, लोणंद 4,

खटाव तालुक्यातील खटाव 2, धोंडेवाडी 1, चितळी 1, वरुड 1, दारुज 1,वडुज 2,

माण तालुक्यातील गोंदवले बु. 1, म्हसवड 9, शिंगणापूर 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 14, चंचली 1, जळगांव 10, ल्हासुर्णे 1, तांदुळवाडी 3, जांब 2, चिमणगाव 9, नांदगिरी 3, रहिमतपूर 12, आदर्श कॉलनी 3, गोळेवाडी 3, सुभाष नगर 2, भाकरवाडी 3, पाडळी 1, भक्तवडी 6, पिंपोडे खु. 1, बोरगांव 2, वाठार किरोली 1, व्यापार पेठ 1, तारगांव 7, सातारा रोड 2,सरकळवाडी 1, पिंपोडे 2, साखरवाडी 1, चौधरवाडी 1, राऊतवाडी 1, बाझारपेठ 1, एकंबे 1, कटापूर 1, निगडे 1, बनवडी 1,

वाई तालुक्यातील शहाबाग 6, धोमपुनर्वसन 1, अनपटवाडी 2, सोनगिरवाडी 1, लाखनगर 3, ब्राम्हणशाही 1,ज्ञानदेव नगर 1, गितांजली हॉस्पिटल 1, सीसीसी वाई 15, ग्रामीण रुग्णालय 1, रविवार पेठ 2, मधील आळी 2, सिध्दनाथवाडी 1, यशवंतनगर 3, चिखली 1, चांदवाडी 1, धर्मपुरी 2, कोचलेवाडी 1, वाई 1, बोपर्डी 1,

जावली तालुक्यातील कुडाळ 1, पिंपळी 2,हुमगाव 1, सोनगाव 2, सायगांव 4, बामणोली 2, माउशी 7,भणंग 1,रिटकवटी 2, रांगेघर 1, मेढा 2, अनेवाडी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील चिखली 1, वाडा कुंभरोशी 1, पंचयात समिती 1, तापोळा 1,बदरवाडी 1, आंब्रळ1, शिंदेवाडी 1, पाचगणी 1,

इतर 4
बाहेरील जिल्ह्यातील नृरसिंहपूर ता. वाळवा जि. सांगली 2 ,नेर्ले वाळवा सांगली 8, इस्लामपूर 3, नाशिक 2, भवानी नगर वाळवा सांगली 2, सांगली 1, शिरवाडे सांगली 2, काले सांगली 1,

25 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे सातारा तालुक्यातील शाहुनगर येथील 45 वर्षीय पुरुष, पाडळी येथील 64 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 36 वषी्रय पुरुष, सोनवडी पो. गातवडे येथील 72 वर्षीय पुरुष, विासवा नाका येथील 78 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय महिला, कोंडवे येथील 77 वषी्रय पुरुष, अंगापूर येथील 85 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शागनगर सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 58 वषी्रय पुरुष, लाखा नगर वाई येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय महिला, अंबेरी ता. वाई येथील 40 वर्षीय पुरुष, तोंडोली ता. कडेगाव येथील 70 वर्षीय महिला, वरुड ता. खटाव येथील 72 वषी्रय पुरुष, तर सी. सी. सी. पुसेगाव येथील 1 पुरुष, पारले ता. कराड येथील 2 महिला व 3 पुरुष, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 1 महिला व 3 पुरुष असे एकूण 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

शनिवार पर्यंत जिल्हय़ात
घेतलेले एकूण नमुने — 54790
एकूण बाधित — 22863
घरी सोडण्यात आलेले —13937
मृत्यू — 624
उपचारार्थ रुग्ण — 8302

Related Stories

मराठा आरक्षणासाठी चोराडे ग्रामस्थांची पालकमंत्र्यांच्याकडे धाव

Omkar B

जावलीत चार रुग्णांची भर!

Patil_p

कोयना धरणाचे दरवाजे साडेचार फुटांवर

Patil_p

पेट्रोल डिलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन

Patil_p

सातारा : करंजे एमआयडीसीत कोण गब्बर?

Archana Banage

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सातारा जिल्हा दौऱ्यावर

Archana Banage