प्रतिनिधी/सातारा
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौकात अपघाताचा थरार उडाला. मद्यपी कार चालकाने सातारा ते कोरेगाव जाणाऱ्या रोडवर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दोन दुचाकी, दोन रिक्षा आणि दोन चार चाकी वाहनांना उडवले. या घटनेत त्यांच्यासह आठजण जखमी झाले. यातील जखमी आणि चालकाचे नाव समजू शकले नाही. अपघातातील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

