Tarun Bharat

सातारा : भाजपकडून ‘शेतकरी विरोधी पत्रक’ फाडून ठाकरे सरकारचा निषेध

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

जय जवान जय किसान, कृषी सुधारणा कायदा महाराष्ट्रात मंजूर झालाच पाहिजे, ठाकरे सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ परिसरात जोरदार घोषणा देत राज्य सरकारच्या निषेध पत्रके फाडून करण्यात आला. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार, निलेश शहा, सुणेशा शहा, सुनील कोळेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना विकास गोसावी म्हणाले, भाजपच्या केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विधेयके मांडली. लोकसभा आणि राज्यसभेत ती बिले मंजूर करण्यात आली. राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीकडे गेलेली आहेत. असे असताना राज्य सरकार त्यांच्या दलालांना वाचवण्यासाठी हे कायदे महाराष्ट्रात लागू करू इच्छित नाही. वास्तविक पाहता शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला माल विकू शकतो. शेतकरयांना या बिलाचा फायदा होणार आहे. परंतु हे तिघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही तर दलालांच्या बाजूने आहे. त्यांच म्हणणं असं की शेतकऱ्याच काहीही होवो पण दलाल जगला पाहिजे, ही ठाकरे सरकारची भूमिका आम्ही हणून पाडू, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

भ्रष्टाचार करणाऱयांना सातारकरांनी घरी बसवावे

Patil_p

विलासपूर-शाहूपुरी येथे पालिकेच्या विभागीय कार्यालयांची मागणी

Patil_p

वाई किसनवीर चौकात पोलिसांची वाहनचालकांवर कारवाई

Patil_p

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अद्यापही सुरुच

Patil_p

टेम्पो-दुचाकी अपघातात तरुण ठार

Patil_p

सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घुले यांचा अजितदादांच्या हस्ते सन्मान

Patil_p
error: Content is protected !!