प्रतिनिधी / महाबळेश्वर
जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या खचलेल्या जमिनीची तसेच पडलेल्या भेगांसह भुस्खलनाची पाहणी भारतीय भुगर्भ शास्त्रज्ञांनी केली या शास्त्रज्ञांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या दरे दुधोशी व कोंडोशी या गावातील जमिनींची पाहणी केली. भुस्खलनाचे कारण शोधून त्यावर उपाय योजना करण्यासाठी ही भेट होती अशी माहीती महसूल विभागाने दिली आहे.
जुलै महिन्याच्या 22 आणि 23 तारखेला महाबळेश्वर तालुक्यात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे तालुक्यात हाहाकार माजला होता. महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते वाहुन गेल्याने या भागातील 22 गावांचा संपर्क तुटला होता. महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर उतारावरून भुस्खलन झाले. कोसळलेल्या दरडी नदीत व तेथुन नदीपात्रा लगत असलेल्या शेत जमिनीमध्ये गेल्या अनेक नद्यांनी आपले प्रवाह बदलले व थेट रस्ता शोधुन वाहु लागल्या त्यामुळे नदी किनारी असलेल्या अनेक घरांना याचा फटका बसला आहे.
अनेक घरांची नासधुस झाली घरात पाणी शिरले व घरातील संसारोपयोगी साहित्याची नासाडी झाली जमिनी जागोगाजी खचल्या अनेक ठिकाणी जमिनींना भेगा पडल्या या दोन दिवसात झालेल्या पावसाने अनेक गावांवर जमिनी मध्ये गडप होण्याचा धोका उद्भवला होता तर काही ठिकाणी गावावर दरड कोसळुन अनेक गावांवर माळीण सारखी परिस्थिती ओढवली होती सुदैवाने मात्र अशी वेळ आली नाही त्यामुळे जीवीत हानी यावेळी झाली नाही परंतु पुढे भविष्यात होणार नाही अशी शाश्वती कोण देवु शकत नाही म्हणुन तालुक्यातील सुमारे 25 पेक्षा अधिक गावांनी पुर्नवसनाची मागणी केली आहे.
महाबळेश्वरला भुस्खलन अथवा दरडी कोसळणे हे प्रकार काही नविन नाहीत परंतु यंदा मात्र या प्रकारांची मालिका तयार झाली. एकाच वेळी अल्पावधीत या सर्व प्रकारची आपत्ती महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागावर कोसळली. या आपत्तीमुळे सर्वच हादरले आहे. यातुन सावरण्यासाठी शासनाकडून केले जाणारे प्रयत्न पुरेसे नाहीत. सध्या इतक्या मोठया प्रमाणावर भुस्खलन का झाले याचा आभ्यास करण्यासाठी येथे भुगर्भ शास्त्रज्ञांनीची टीम यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी भुगर्भ शास्त्रज्ञ परीमिता मॅडक, रिंपी गागई यांच्यासह या पाहणी वेळी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चैधरी पाटील या देखिल उपस्थित होत्या. स्थानिक नागरीक म्हणुन या भागातील जाणते नेते अभयसिंह हवालदार, बाळासाहेब पार्टे व आनंद कोतवाल, सुरेश सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते,