Tarun Bharat

सातारा : मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतले खा. शरद पवार यांचे आशीर्वाद

Advertisements


सातारा / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पवार यांनी बाळासाहेब पाटील यांच्या कामाचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे कार्य कराड उत्तर मतदार संघापुरते मर्यादित नव्हते. प्रत्येक गावागावात त्यांनी सहकाराची मोट बांधली गेली आहे. मंत्री पदाची धुरा हाती आल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. कोरोनाच्या संकट काळात राज्याच्या पणन विभागाच्या व सहकार विभागाच्या मार्फत हिताच्या योजना राबविण्यात आल्या. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांचे मुंबईत जाऊन आशीर्वाद घेतले.पवार यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Stories

महाराष्ट्र-कर्नाटकमधील कटुता संपवण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न; चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

Archana Banage

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन

Abhijeet Khandekar

बीडमध्ये मराठ्यांचा संघर्ष मोर्चा

Archana Banage

किरीट सोमय्या सोमवारी शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांच्या घोटाळ्यांचा बॉम्ब फोडणार

Archana Banage

महाराष्ट्रात यापुढे काँग्रेसच सत्तेत राहणार

Archana Banage

महत्वाची बातमी! यंदा दहावी,बारावी निकाल २० जूनच्या आधी

Rahul Gadkar
error: Content is protected !!