Tarun Bharat

सातारा : मरणानंतरही माणूस माणसाला विचारेना…

ॲड.फरांदे यांनी दीड तास प्रयत्न केल्यानंतर सातारा पोलिसांनी नेला मृतदेह

सातारा / प्रतिनिधी : 

मागील दोन दिवसांपासून सातारा येथील बांधकाम भवनासमोरच्या कठड्यावर बसून असलेल्या अनोळखी व्यक्तीचा आज सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृतदेहाची माहिती नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते ॲड. धनंजय फरांदे यांना दिली. फरांदे यांनी पोलिसांना कळवले तरीही पोलीस न आल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना फोन करून माहिती दिली. तेव्हा पीसीआर पोहचली.

पीसीआर मधील दोन महिला पोलीस आणि होमगार्ड यांनी याची माहिती पोलीस ठाण्यास दिली. एका होमगार्डने खाली उतरून पाणी त्या व्यक्तीच्या अंगावर टाकून जागा आहे का याची खात्री केली. फरांदे यांनी जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पाठवा अशी विनंती केली. परंतु, रुग्णवाहिका नसल्याचे सांगितले. त्यावरून जिल्हा परिषदेची रुग्णवाहिका नागठाणे येथून तेथे पोहचली. रुग्ण वाहिकेच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी करून तो मृत असल्याचे सांगितले. आता ती बॉडी आम्ही नेऊ शकत नाही, असे रुग्णवाहिका व पीसीआरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

पीसीआरच्या महिला कर्मचाऱ्यांची फोन सुरू असताना फरांदे यांचे फोन सुरू होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे जवान तेथे आले. अन त्यांनी कार्यवाही सुरू केली. फरांदे यांनी फिर्याद दाखल करताच लगेच पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. अनोळखी मृतदेह आढळून आल्याची नोंद सातारा शहर पोलिसात झाली आहे.

खासदार उदयनराजे यांनी केली चौकशीपीसीआरची गाडी थांबल्याची बाब खासदार उदयनराजे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गाडी थांबवली. पीसीआरमधील महिला पोलीस व चालक महिला पोलीस यांनी उदयनराजे यांना यासंदर्भात माहिती दिली.

Related Stories

चोरीस गेलेला १६ लाखांचा बकरा कराडात सापडला

Archana Banage

बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

Patil_p

सिव्हील हॉस्पिटलमधील धोब्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

प्राथमिक आरोग्य केंद्रास हुतात्मा जवानांची नावे देण्याची मागणी

Patil_p

राष्ट्रीय स्पर्धेत सुदेष्णा कांस्य पदकांची मानकरी

Patil_p

सामाजिक वनीकरणात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन

Archana Banage
error: Content is protected !!