Tarun Bharat

सातारा : महाबळेश्वर शहर झाले कोरोनामुक्त

Advertisements

कोरोनामुक्त होणारे महाबळेश्वर ठरले पहीले शहर

प्रतिनिधी / महाबळेश्वर

महाबळेश्वर येथे सक्रिय कोरोना रूग्णाची संख्या एक असुन हा एकमेव कोरोना रूग्ण पाचगणी येथे उपचार घेत आहे. आज शहरात एकही कोरोनारूग्ण नाही. त्यामुळे कोरोनामुक्त झालेले महाबळेश्वर हे जिल्हयातील पहीले शहर ठरले आहे.

दोन दिवसांपुर्वी गवळी आळी येथील एक महीलेला कोरोनाचा संसर्ग झाला ही महीला उपचारासाठी आता पाचगणी येथे दाखल करण्यात आले आहे. या एका रूग्णांमुळे शहरात कोरोना झालेल्या रूग्णांची एकुन संख्या 781 झाली आहे या पैकी 22 रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर 758 रूग्ण आज अखेर कोरोनातुन बरे झाले आहेत सक्रिय रूग्ण संख्या 1 आहे शहरातील 45 वर्षांवरील नागरीकांची संख्या 3099 असुन या पैकी 1955 नागरीकांनी कोरोना लसीचा पहीला तर 621 नागरीकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.शहरातील 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींची संख्या 5021 असून या पैकी 1017 व्यक्तींनी कोरोना लसीचा पहीला डोस घेतलेला आहे रोज ठराविक लसी उपलब्ध होत असुन लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे दरम्यान पालिकेतील 321 कर्मचारी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहीती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

सातारा जिल्हा हा कोरोना संसर्गाच्या चैथ्या टप्प्यात असला तरी महाबळेश्वर शहर हे कोरोना मुक्त झाले आहे आता प्रशासनाने महाबळेश्वर बाबत नव्याने विचार करणे आवश्यक आहे महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही थंड हवेची ठिकाणं ही पर्यटनावर अवलंबुन आहेत विकेंडला महाबळेश्वर शहर वगळता तालुक्यात मोठया प्रमाणावर पर्यटक दाखल झाले होते.

या पर्यटकांना शहरात प्रवेश मिळत नसला तरी शहरा लगत असेलेल्या नागरी वसाहतीमध्ये पर्यटकांना निवासासह सर्व सोई सुविधा मिळत आहेत. अशा स्थितीत शहरात कोरोना नियमांचे कोटकोरपणे पालन करणार्या सर्व व्यवसायिकांवर व नागरीकांवर हा अन्याय आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा स्थितीत प्रशासनाने शहरातील नागरीकांना वेठीस त्यांचा अंत पाहु नये महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटन स्थळे सुरू करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Stories

दोन ठिकाणी घरफोडी सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Patil_p

स्ट्रीट लाईट तातडीने सुरु करा-उदयनराजे

Patil_p

सातारा : एक एप्रिलपासून ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण

Abhijeet Shinde

टीईटी नापास शिक्षकांचे वेतन थांबणार

Patil_p

तापमान 18 अंशाच्या खाली

Patil_p

जलसंधारणासाठी १० कोटींचा निधी, शेती सिंचन योजनांना होणार फायदा – आ. मकरंद पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!