सातारा/प्रतिनिधी
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्त्याचे दुभाजक ठिकठिकाणी हॉटेल चालकांनी फोडले आहेत. पाठीमागे शहरानजीकच्या डिमार्ट येथे महामार्ग फोडून शॉटकट केला होता. यामुळे अनेक अपघात झाले होते. आंदोलने केल्यानंतर हा शॉटकट बंद करण्यात आला. आता पाचवड (ता.वाई)येथून अर्धा किलोमीटर अंतरावर असाच शॉटकट करण्यात आला आहे. महामार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनाचे स्पीड 80 असावे असा नजीक बोर्ड आहे. हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कसे निदर्शनास येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.


previous post