Tarun Bharat

सातारा : महिला वर्गाला गौरीच्या आगमनाचे वेध

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

तेज, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱया गौरीचे आगमन येत्या मंगळवार दि. 25 रोजी दुपारी होणार असले तरी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी सुरू झाली आहे. गौरींचे मुखवटे, त्यांचे हात, पावले, स्टॅड, सजावटीचे साहित्य, साडया, दागदागिने खरेदीसाठी महिलांमध्ये लगबग दिसत आहे.

गौरीच्या रूपाने सासुरवाशिणी लेकी माहेरी येतात अशी धारणा आहे. काहींकडे खापराचे-पितळाचे मुखवटे तर काहेंकडे धातूंचे, तसेच मातीच्या उभ्या अथवा पाटावर मांडलेल्या गौरी असतात. गौराईची तीन दिवस पुजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण केला जातो. अवघ्या एक दिवसावर आलेल्या उत्सवाच्या निमित्ताने सजावटीसाठी लागणारे दागिने, साडी-चोळी, साजश्रृंगाराचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. कुठे नव्या मुख्यवटय़ाची खरेदी, तर कुठे जुन्याच मुखवटय़ांना नवी झळाळी देण्याचे काम लगबगीने करण्यात येत आहे.

गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध झाले असून त्यांच्या किंमती पाचशे रूपये ते साडेपाच हजार रूपयांपर्यंत आहेत. यासोबत मंगळसूत्र, चपलाहार, मोत्यांच्या माळा, जोडवी, बांगडया, नथ, अशा पारंपारिक दागिन्यांसह विविध साडयाही खरेदी केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. गणपती पाठोपाठ गौरीचे आगमनही साध्या पद्धतीने करण्यावर महिला भर देताना दिसत आहेत. खर्चाला आवर घालत उपलब्ध साहित्यांचा वापर करण्यात येत आहे.

Related Stories

मांडवे येथे पुन्हा ढगफुटी

Patil_p

अंगणवाडी सेविकांकडून मोबाईल परत

datta jadhav

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण करुन घ्या

Patil_p

वेळेमधील 12 खातेदारांचे पुनर्वसन

datta jadhav

जिल्ह्यासाठी डिसेंबर एंडिंग ठरतोय दिलासादायक

Archana Banage

Satara; स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवातही रुग्णांना घ्यावा लागतोय ‘ढालग्याच्या अ‍ॅम्ब्युलन्स’चा आधार

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!