Tarun Bharat

सातारा : मांघर ते चतुरबेट दरम्यान एक जण बेपत्ता

प्रतिनिधी / महाबळेश्वर

मांघर ते चतुरबेट या पायवाटेने घरी निघालेला सयाजी काशीराम शेलार वय 46 रा. चतुरबेट हा घरी पोहचला नाही. त्या मुळे तो हरविला असल्याची तक्रार त्यांचे बंधु भागुजी काशिराम शेलार यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दिली आहे. तक्रारी नुसार महाबळेश्वर पोलिसांनी मिसिंग दाखल करून हरविलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

चतुरबेट येथील सयाजी काशिराम शेलार हे देवळी मुरा झोळाची खिंड येथील पुजा फार्म हाउस या हॉटेल मध्ये कामाला होते. 9 सप्टेंबर रोजी त्यांनी सुट्टी घेतली. त्या दिवशी ते महाबळेश्वरला आले. त्यांनी बाजार केला. घरी जाण्यासाठी बस नसल्याने ते मांघर पर्यंत आले. तेथुन मांघर ते चतुरबेट अशी पाय वाट आहे. या पायवाटेने आपल्या घरी दुपारी दोन वाजता ते निघाले ते पायवाटेने निघालेले. तेथील एका शिक्षकाने पाहीले होते. परंतु ते त्या दिवशी घरी पोहचलेच नाहीत. दुसरे दिवशी या पायवाटेने त्यांचा शोध घेतला. परंतु ते कोठे सापडले नाही. दोन दिवस वेगवेगळया ठिकाणी शोध घेतल्या नंतर ते हरविल्याची खा.त्री झाली म्हणुन त्यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात मिसींग दाखल केली आहे महाबळेश्वर पोलिस आता या हरविलेल्या इसमाचा शोध घेत आहेत.

Related Stories

सातारा : तक्रारदार नगरसेवकांचाच राजवाडा बसस्थानक परिसरात अपघात

Archana Banage

जिल्हय़ातील 61 घरांची पडझड

Patil_p

लसीचा दुष्काळ, मग लसोत्सव कसा होणार ?

Archana Banage

Kolhapur; आरे गावाच्या पुनर्वसनासाठी गायरानातील जमिन मिळण्याची मागणी

Abhijeet Khandekar

सैनिक स्कूल पिरवाडी परिसरात दुर्मिळ ब्लॅक पँथरचा वावर; परिसरात खळबळ

Archana Banage

पेटून उठा, फिल्डिंग टाइट ठेवा : पालकमंत्री सतेज पाटील गरजले

Abhijeet Khandekar