Tarun Bharat

सातारा : माजी सैनिकाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अवमान

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :   

राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त माजी सैनिक, साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे हे त्यांच्या सामाजिक कामानिमित्त जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या दालनात भेटण्यास गेले होते. तेव्हा शेखर सिंह यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देत कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. याच्या निषेधार्थ माळवदे दि. 9 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर आंदोलन करुन या घटनेचा निषेध करणार आहेत.

याबाबत शंकर माळवदे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त पुणे, पोलीस अधिक्षक, सातारा यांना निवेदन दिले असून, या घटनेबाबत ते वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहेत. निवेदनात म्हटले आहे की, दि. 2 रोजी साताऱ्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी होत असलेल्या विलंबाबत निवेदन देण्यासाठी गेले होते.  

त्यावेळी निवेदन घेतल्यानंतर जिल्हाधिकार शेखर सिंह यांनी अचानकपणे जोराने व आवेशात येवून सामाजिक कार्य करु नका, असे सांगत त्यांच्या कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ता, माजी सैनिकाचा व लोकप्रतिनिधीचा केलेला अपमान आहे. शहरातील मिळकतधारकांच्या संदर्भाने महत्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यास गेलेले असताना माळवदे यांना या प्रकारास सामोरे जावे लागले आहे.

Related Stories

साताऱ्यात गुलाल उधळणाऱ्या गणेश मंडळाविरुद्ध गुन्हा

datta jadhav

त्यांना ५० लाखाचा विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार

Archana Banage

सातारा आगारातील एसटी कर्मचाऱयांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

Patil_p

सातारा : कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी आणखी सहा दाहिन्या

datta jadhav

खोडद चोरीतील तीन चोरटे 24 तासांत जेरबंद

Patil_p

कुसूरमध्ये शेतात आढळले तीन बछडे

Patil_p
error: Content is protected !!