Tarun Bharat

सातारा : यवतेश्वर घाटात रात्रीच्या गाड्य़ा फिरवणाऱ्या 9 जणांवर गुन्हे दाखल

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

रात्रीच्या वेळेस बोगदा ते सांबरवाडी या रस्त्यावर दुचाकी व चार चाकी गाड्य़ा फिरवून जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी 9 जणांवर शाहुपूरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलिसांच्या पथकास गस्त घालताना हे युवक आढळून आले. रात्रीच्या वेळेस गाडय़ा घेवून विनाकारण फिरणाऱयांवर गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत शाहुपूरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शाहुपूरी पोलिसांना गस्त घालताना बोगदा ते सांबरवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर पॉवरहॉऊस झोपडपट्टी नजिक विनाकारण फिरताना आढळून आलेले अमोल देवाप्पा सुर्यवंशी (वय 30, रा. जांबवाडी, सांगली), सागर एकनाथ साळुंखे(वय 31), राहुल ईश्वर चव्हाण (वय 30, तिघे रा. जांबवाडी सांगली), विजय भगवान चव्हाण(वय 34, रा. पटेल चौक सांगली) हे चौघे क्रेटा क्र. एमएच10सीएक्स9798 वरुन दि.9 रोजी रात्री पावणे दोन वाजता आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच वेडीवाकडी गाडी रात्री दीड वाजता यवतेश्वर घाटात चालवणारे इनोव्हा एमएच11 वाय3133मधील भूषण मंगेश वाडेकर (वय 21, रा. शनिवार पेठ सशातारा), मयुरेश चंद्रकांत सावंत(वय 22, रा. 10 यादोगोपाळपेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गणेश नामदेव पवार(वय 27), दादा पांडूरंग लष्करे(वय 30, दोघे रा. मंगळवार पेठ, सातारा) हे सेव्हरलेट एमएच02एएल6261 या गाडीवरुन तर साईनाथ उर्फ टिंकू संभाजी पवार(वय 29, रा. मंगळवार पेठ) याची स्ट्रनर दुचाकीवरुन बोगदा ते यवतेश्वर रस्त्यावर पॉवर हॉऊस येथे विनाकारण दुचाकीवरुन फिरत असताना आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलिस तपास करत आहेत.

तडीपार गुन्हेगारास घेतले ताब्यात

शाहुपूरी पोलिस बोगदा परिसरात गस्त घालत असताना एक वर्षाकरता तडीपार असलेला गुन्हेगार बोगदा येथे उभा असल्याचे निदर्शनास येताच त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव विजय उर्फ पिल्या राजू नलवडे रा. मंगळवार पेठ असे आहे.

याबाबत शाहुपूरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शाहुपूरी पोलीस ठाण्यासचे पोलिस कॉन्स्टेबर पंकज मोहिते व होमगार्ड खरात हे गस्त घालत आताना रात्री 9.20 वाजता बोगदा येथे हद्दपार असलेला विजय उर्फ पिल्या नलवडे उभा असल्याचे आढळून आले. त्याने प्रातांधिकाऱयांचा आदेश मोडल्याने होमगार्डच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्यावर शाहुपूरी पोलिसात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 489 जण कोरोनाबाधित; तर 15 जणांचा मृत्यू

Archana Banage

महाराष्ट्र केसरीसाठी जिह्यातून मॅटसाठी सरक तर मातीसाठी सुळ

Patil_p

सातारा सैनिक स्कूल सीबीएससी दहावीचा निकाल १०० टक्के ‌

Archana Banage

सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावर गस्तीला पोलीस

Archana Banage

खटावचे जवान अजिंक्य राऊत यांचे निधन

Patil_p

नवजा येथे रस्त्याला भगदाड, रस्ता वाहूतुकीसाठी बंद, मोठा अनर्थ टळला

Archana Banage
error: Content is protected !!