Tarun Bharat

सातारा : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने दिले भावाला जीवदान

Advertisements

तानाजी भंडलकर / आदर्की

बहिण भावाच नात दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिणीन बांधलेल्या राखीची ओवाळणी म्हणून बहिणीच रक्षण करण हि भावाची जबाबदारी असते. पण या रक्षाबंधनाच्या दिवशी एका बहिणीने आपली किडणी देवून भावाला जिवन दान दिले आहे . हि घटना आहे फलटण तालुक्यातील आळजापुर येथील नलवडे कुटुबातील बहिण-भावाची.

फलटण तालुका पश्चिम भागातील आळजापुर गावच पोलीस पाटील शंकरराव नलवडे वय ५९ वर्ष हे मागील वर्षापासून सतत आजारी होते. स्थानिक उपचारानंतर त्यांना पुणे येथील खाजगी हॉस्पीटल येथे उपचार केले सर्व तपासण्या अंती त्यांची किडणी निकामी झाल्याच निदान झाल. त्यामुळे शस्त्रक्रिया करुन किडणी प्रत्यारोपण करण हाच एकमेव पर्याय नलवडे कुटुबियांपुढे राहिला. त्यासाठी खर्चही आवाक्याबाहेर होताच तरीही नलवडे कुटुंबाने पैशाची जमवाजमव केली, शिवाय शंकरराव नलवडे यांचे राजकीय संबध असल्याने विधान परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही आर्थीक मदत करण्यास पुढाकार घेतला.

मात्र कोरोनाच्या संकटात वेळोवेळी लॉकडाऊन वाढत असल्याने सरकारी नोंदी असणारे किडणी दातृत्व मिळत नव्हते. त्यामुळे नलवडे यांच्या कुटुंबातील पत्नी व चार बहिणींनी किडणी दातृत्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या सर्व तपासण्या पुर्ण झाल्यानंतर कापशी ता. फलटण येथील सावित्रा भोसले या बहिणीची किडनी प्रत्या पर्ण करण्यास योग्य असल्याचे निदान झाले आणि शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग सुकर झाला.

योगा योगाने काल रक्षाबंधनाचा दिवस आणि त्याच दिवशी भावाला राखी बांधण्याबरोबरच स्वतःच्या किडणीच दातृत्व देवून जिवनदान देण्याच भाग्य त्याच्यां बहिणीस मिळाल. सोमवारी रक्षाबंधनाचा दिवस शंकरराव नलवडे यांना पुणे येथील खाजगी हॉस्पीटल मध्ये दाखल केल अन अनोखी घटना घडली त्यांच्या भगिनी सावित्री भोसले यांनी आधी राखी बांधण्याच कर्तव्य बजावल आणी सायंकाळी किडणी काढून पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करुन प्रत्यापर्ण करण्यात आल हि शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या ठरल्या नलवडे कुटूबांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

वाडवडिलांच्या वारसा हक्काने मालवत्तेवर हिस्सा मागणाऱ्या बहिणींना बेदखल करण्याची अनेक उदाहरणे समाजात घडत असतात. पण कोणताही लोभ न बाळगता केवळ आपल्या बंधूच आयुष्यमान वाढाव या भावनेतुन पाठीराखा भावाला रक्षाबंधना दिवशी किडणी दातृत्व भेट करून सावित्री भोसले यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे.

Related Stories

एमआयडीसीला चोरटय़ांची साडेसाती

Patil_p

नव्या सरकारच्या खातेवाटपात महत्त्वाची खाती भाजपकडेचं?

Abhijeet Khandekar

शेतकरी सन्मान दिवस साजरा

Archana Banage

जिल्हय़ात लम्पीचा धोका वाढला

Kalyani Amanagi

सातारा : गिरीश बापट यांनी घेतली उदयनराजेंनी भेट

datta jadhav

लोणंद – शिरवळ रोडवरील अपघातात ग्रामविकास अधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!