Tarun Bharat

सातारा : रणजित देशमुख यांचे औद्योगिक प्रकल्प राज्याला दिशा देणारे : माजी मंत्री राजेंद्र मुळक

हरणाई सहकारी सुतगिरणी सदिच्छा भेट

प्रतिनिधी / औंध

खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यात प्रतिकूल परस्थितीत रणजितसिंह देशमुख यांनी स्वत:च्या आत्मविश्वासावर प्रकल्प उभारून आदर्शवत चालवून दाखवले आहेत. हे औद्योगिक प्रकल्प राज्याला दिशा देणारे ठरतील असे गौरवोद्गार माजी अर्थ व पणन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केले.

येळीव ता.खटाव येथील हरणाई सहकारी सुतगिरणी सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हरणाई उद्योग समुहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, राहूल चव्हाण, सुनिल चव्हाण, संचालक रणधीर जाधव, मोहनभाऊ देशमुख, गजानन शिंदे,निलेश घार्गे, अमृत मटकल्ली,अजय गुरसाळे सयाजी सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळक पुढे म्हणाले की, रणजितसिंह मला भावासारखे असून त्यांची कार्यपद्धती व धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे या भागाबद्दलची ओढ व समाजकारण आपण जवळून पाहिले आहे. त्यांची औद्योगिक विचारसरणी व राजकीय दबदबा या खटाव-माण तालुक्याला नवी दिशा व उर्जा प्राप्त करून देईल यात तिळमात्र शंका नाही. या भागात नवनवे प्रकल्प उभारून येथील शेतकरी व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. अश्या नेतृत्वाला लवकरच संधी प्राप्त होईल व या भागाचा उर्वरीत विकास होईल असा विश्वास ही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात हरणाई उद्योग समुहाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी हरणाई सहकारी सुतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी ची प्रगतीबद्दल बोलून साखर कारखान्याविषयी विस्तृतपणे माहिती दिली.तर सुतगिरणी उभारताना माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जनरल मॅनेजर रमेश भोसले यांनी केले.तर आभार राजकुमार चौगुले यांनी मानले.

Related Stories

सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना बॉयलर स्फोट,एक ठार तर सहा जखमी

Archana Banage

बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश; कोरोना रुग्णांवर करत होती उपचार

datta jadhav

डोक्यात कुऱहाड घालून पत्नीचा निर्घृण खून

Patil_p

1 कोटी 80 लाखाच्या कोकेन बाळगल्याप्रकरणी परदेशी नागरिकास अटक

Archana Banage

स्व.विलासकाकांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात रविवारी शोकसभा

datta jadhav

गृहराज्यमंत्री देसाईंवर पाळत ठेवण्याचा प्रकार

datta jadhav