Tarun Bharat

सातारा : राजधानी किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडला नवा चौथरा

संवर्धन कार्य करताना राजा शिवछत्रपती परिवारास मिळालेली पेटी ब्रिटिश कालीन

प्रतिनिधी / सातारा

राजा शिवछत्रपती परिवारातील मावळे किल्ले अजिंक्यतारा येथे स्वच्छता करत असताना त्या मावळ्यांना एक दगडी चौथरा सापडला असुन चौथऱ्यावर एक ब्रिटीश कालीन लोखंडी बांधणीची पेटी आढळुन आली. राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्रभर बावीस जिल्ह्यामध्ये अनेक गडदुर्गावंर स्वच्छता मोहीम राबवत असतात कील्ले अजिंक्यतारा येथे कोरोनाचे सर्व नियम पाळुन मावळे स्वच्छता करत असताना छत्रपतींचा ठेवा असणाऱ्या या दुर्गावर हा चौथरा अढळला.

जाणकारांच्या मते लोखंडी बांधणीची चौकोनी भारदस्त पेटी ही ब्रिटीशकालीन असावी असे सांगितले जाते. सातारकर व शाहुनगरवासियांनी अजिंक्यताऱ्याचे अस्तित्व जपण्यासाठी अजिंक्यतारा पुन्हा पुनर्जिवीत करण्यासाठी स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हावे असे मत राजा शिवछत्रपती परिवाराचे सातारा जिल्हाध्यक्ष मावळा विशाल शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द

datta jadhav

अखेर ‘ते’ जहाज बुडाले; 130 जण बेपत्ता

datta jadhav

मतमोजणीविरोधात ट्रम्प न्यायालयात

datta jadhav

वासोटा पर्यटन, बोटिंग आजपासून होणार पूर्ववत सुरु

Patil_p

Kolhapur: सीएचबीधारकांची दिवाळी झाली गोड

Archana Banage

वनवासमाचीत महिलेचा दगडाने ठेचून खून

datta jadhav