Tarun Bharat

सातारा : रिक्षाचालकांचे अनुदान बँक खात्यात जमा होणार

गोडोली / प्रतिनिधी

राज्यात कोविड-१९ या आजाराच्या पार्श्वभुमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना रुपये १५०० सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे.परिवहन विभागाने त्यासाठी आवश्यक पोर्टल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याद्वारे पैसे हे बँक खात्यात जमा होणार असून त्यासाठी कोणताही फाँर्म भरुन आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही.मात्र काही संघटनेच्या प्रतिनिधी कडून फाँर्म भरून घेतले जात असल्याच्या तक्रारी परिवहन कार्यालयाकडे आल्या असल्याचे परिवहन उपायुक्त लक्ष्मण दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे सांगितले आहे.

शासनाने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी काही प्रतिनिधी संघटना यांचेकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत. त्याचा काही ही गरज नाही.राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान सरळपणे त्यांचे बँक अकाऊंटमध्ये देण्याबाबत पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरु आहे. यासाठी कोणताही फॉर्म भरुन देण्याची अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन कार्यप्रणाली सुरु करतेवेळी सर्व रिक्षा चालकांना सुचित करण्यात येणार आहे. सातारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी “सातारा जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी अनुदान उपलब्ध होईल तेव्हा कळवले जाईल,” असे ‘तरुण भारत ‘ शी बोलताना सांगितले.

Related Stories

बुधगावचा ‘यश’ मराठीतील उगवता तारा!

Patil_p

पेट्रोल डीझलची मोदी सरकारने केलेली दरवाढ जनतेचे कंबर्डे मोडणारीच

Patil_p

काही चांगलही घडतंय..

datta jadhav

अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

सातारा सैनिक स्कूल सीबीएससी दहावीचा निकाल १०० टक्के ‌

Archana Banage

शेतकरी संघटनेने रोखली ऊस वाहतूक

Patil_p