Tarun Bharat

सातारा रेल्वे पोलीस स्टेशन कार्यान्वित करा, खा. श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत मागणी ; रेल्वे संदर्भातील मुद्दे केले उपस्थित

कराड / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातून जाणा-या लोहमार्गावर रेल्वेचे थांबे वाढवावेत यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सातारा रेल्वे पोलीस स्टेशन सुरू करावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.
सातारा जिल्ह्यातून जाणा-या मध्य रेल्वे मार्गाच्या संदर्भातील मुद्दे लोकसभेत उपस्थित करत खा. श्रीनिवास पाटील यांनी या मागण्या केल्या. ते म्हणाले, पुणे-मिरज-हुबळी मध्य रेल्वे मार्गावरील लोणंद या ठिकाणी मोठी बाजारपेठ व औद्योगिक क्षेत्र आहे. तसेच आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्वर महारांजाची पालखी या ठिकाणावरून जात असते. या पालखी सोहळ्यास लोखो भाविकांची उपस्थिती असते. परंतु हे शहर रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेले आहे. त्यामुळे एका बाजूवरून दुस-या बाजूला जाण्यासाठी नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. याठिकाणी एक अंडर पास व दोन ओव्हर ब्रीज बांधले गेल्यास ते नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहेत.
दक्षिण व उत्तरी राज्यातील काही नागरिक सातारा जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. मात्र त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी पुणे किंवा मिरज रेल्वे स्टेशनवर जावे लागते. ते रेल्वे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी मध्य रेल्वेचे थांबे वाढवण्यात यावेत. याशिवाय सातारा शहराजवळ एक रेल्वे पोलीस स्टेशन मंजूर झाले आहे. मात्र गेल्या दहा वर्षापासून ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. परिणामी रेल्वे प्रवासादरम्यान चोरी झाल्यास, महिलांच्या बाबतीत काही गैर कृत्य किंवा अनुचित घटना घडल्यावर त्यासंदर्भातील तक्रार देण्यासाठी नागरिकांना पुणे किंवा मिरज या ठिकाणी जावे लागत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या व सोयीच्या दृष्टीकोनातून येथे मंजूर असलेले पोलीस स्टेशन लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी सभागृहात केली.

Related Stories

साताऱयात अंजली कॉलनीत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेली वाहून

Patil_p

युवतीच्या खूनप्रकरणाचा चार तासात पर्दाफाश

Patil_p

25 वर्षांनी झालेल्या नव्या रस्त्यात खड्डा

Omkar B

सातारा जिल्ह्याची ओळख अपघातमुक्त अशी निर्माण करु या – पोलीस अधीक्षक

Archana Banage

सातारा : मोक्क्यातील आरोपीचा अप्पर पोलीस अधिक्षकांसमोर आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

दहावी परिक्षेस आजपासुन प्रारंभ

Patil_p