Tarun Bharat

सातारा : लॉकडाऊनमध्ये घेतले व्हर्च्युअल क्लासरुम

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व शाळांना सुट्टी आहे.पण या सुट्टीत ही मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे हा हेतू ठेवून व्हॅर्चुअल शिक्षण देण्याचा पहिला क्लास रविवारी चार वाजता ऑन लाईन असा पार पडला.मुलांना शिक्षक एन.ए.कदम यांनी गणित या विषयी शिकवले.

ही संकल्पना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केलेली असून यामध्ये मुक्ताबाई भोसले हायस्कूल नागझरी कोरेगाव व छत्रपती प्रतापसिंह हास्कूल भरतगाववाडी ता.सातारा इयत्ता नववीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, सहसचिवअवधुत चेंडके व भरत मोजर यांचा व्हर्चुअल क्लासमध्ये सहभाग होता.तसेच डायट फलटणचे प्राचार्य कोरडे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी ही विद्यार्थ्यांशी हितगुज केले.माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Related Stories

Satara; पालिका इमारतीच्या बांधकाम खोदकामात आढळून आल्या रायफलीच्या गोळ्य़ा

Abhijeet Khandekar

सातारा : …अखेर बावधनचं बगाड निघालं

datta jadhav

महाविकास आघाडीची सहा मते फुटली, शिवसेनेला कात्रजचा घाट, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी

Rahul Gadkar

जवान ज्ञानेश्वर जाधव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Patil_p

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची होणार गावोगावी प्रसिद्धी

Abhijeet Shinde

सातारा : ऑगस्टमध्ये कोरोना जिल्हय़ात दुप्पट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!